Home /News /technology /

'या' युजर्सला नव्या प्रायव्हसी पॉलिसीचा सर्वाधिक फरक पडेल; WhatsApp चं स्पष्टीकरण

'या' युजर्सला नव्या प्रायव्हसी पॉलिसीचा सर्वाधिक फरक पडेल; WhatsApp चं स्पष्टीकरण

WhatsApp ने आपल्या FAQ पेजला अपडेट केलं आहे. या पेजवर कंपनीने सांगितलं की, दररोज जगभरातील लाखो लोक आपल्या बिजनेसबाबत, आपल्या ग्राहकांशी whatsapp वर चर्चा करतात. WhatsApp बिजनेस याला आणखी सहज करतं.

  नवी दिल्ली, 13 जानेवारी : WhatsApp ने नुकतीच प्रायव्हेट पॉलिसी अपडेट केली आहे. या पॉलिसीमुळे व्हॉट्सअ‍ॅप सतत वादात आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या पॉलिसीमुळे अनेक युजर्स दुसरे मॅसेजिंग अ‍ॅप सिग्नल आणि टेलिग्रॅमकडे वळत आहेत. याचदरम्यान, व्हॉट्सअ‍ॅपकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, नव्या पॉलिसीमुळे सर्वसामान्यांच्या प्रायव्हसीला फरक पडणार नाही. मात्र, व्हॉट्सअ‍ॅपच्या बिजनेस अकाउंट युजर्सला, नव्या प्रायव्हसी पॉलिसीचा फरक पडू शकतो, असं कंपनीने म्हटलं आहे. बिजनेस अकाउंटबाबत whatsapp policy जाणून घेणं गरजेचं आहे. तुम्ही बिजनेस अकाउंट वापरत नाही, मात्र एखाद्या वस्तूच्या खरेदीसाठी, एखाद्या whatsapp business अकाउंटवर मेसेज केल्यास, तुमच्यावरही whatsapp ची नजर असणार आहे. WhatsApp ने आपल्या FAQ पेजला अपडेट केलं आहे. या पेजवर कंपनीने सांगितलं की, दररोज जगभरातील लाखो लोक आपल्या बिजनेसबाबत, आपल्या ग्राहकांशी whatsapp वर चर्चा करतात. WhatsApp बिजनेस याला आणखी सहज करतं.

  (वाचा - फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप विरोधात व्यापारी संघटना; CAIT ने सरकारला लिहिलं पत्र)

  काय आहे फेसबुक होस्टिंग सर्व्हिस - कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मित्रांशी आणि नातेवाईकांशी होणाऱ्या चॅटिंगपेक्षा, बिजनेस चॅटिंग अतिशय वेगळं असतं. काही मोठ्या बिजनेसला आपल्या कम्यूनिकेशनला मॅनेज करण्यासाठी होस्टिंग सर्व्हिसेसची गरज असते.

  (वाचा - Android फोनमध्ये होणार मोठा बदल; बॅकग्राउंड Apps आपोआप बंद होणार)

  व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट मॅनेज करणं, ग्राहकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी फेसबुक होस्टिंगची सुरुवात करण्यात आली आहे. ज्याद्वारे सहजपणे रिसिप्ट पाठवणं, ग्राहकांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासारखी कामं केली जाऊ शकतात. बिजनेस कम्यूनिकेशनवर असणार whatsapp ची नजर - कंपनीने स्पष्टीकरण देताना सांगितलं की, बिजनेस कम्यूनिकेशन फोन, ईमेल किंवा व्हॉट्सअ‍ॅपद्वारे झाल्यास त्यावर नजर असणार आहे. ज्याचा ते आपल्या मार्केटिंगसाठी उपयोग करू शकतात. त्याशिवाय, याचा उपयोग फेसबुक ऍडसाठीही केला जाऊ शकतो. ग्राहकांच्या सुविधेसाठी कंपनी त्या चॅटला लेबल करते, जे फेसबुक होस्टिंग सर्व्हिसेसचा वापर करतील. नवे कॉमर्स फीचर्स - अनेक लोकांचा ऑनलाईन शॉपिंगकडे कल वाढला आहे. फेसबुकचे ब्रँडेड कॉमर्स फीचर्सच्या मदतीने लोक दुकानाप्रमाणे आपलं सामान ग्राहकांना दाखवू शकतात. तसंच लोक खरेदी करणाऱ्या सामानाची माहितीही मिळवू शकतात. याचा वापर ग्राहकांचा शॉपिंग एक्सपिरियंस चांगला करण्यासाठी केला जाईल. तसंच फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर ऍड दाखवण्यासाठीही याचा वापर केला जाईल. ही सर्व्हिस ऑप्शनल आहे. या फीचरचा उपयोग केल्यास, ऍपमध्ये सांगितलं जाईल की, युजरचा डेटा कशाप्रकारे फेसबुकशी शेअर केला जात आहे.

  (वाचा - Whatapp ला नवा पर्याय; जाणून घ्या काय आहे Signal App)

  फेसबुकवर एखाद्या ऍडसह message a business using WhatsApp हे बटण आहे. जर युजरकडे व्हॉट्सअ‍ॅप आधीपासूनच इन्स्टॉल असेल, तर तुम्ही त्या बिजनेसला थेट मेसेज पाठवू शकतात. युजर या फेसबुकच्या ऍडसह ज्याप्रमाणे इंटरऍक्ट कराल, फेसबुक याच डेटाचा वापर करुन, पुढच्या वेळी त्याप्रमाणे युजरला ऍड दाखवेल. कंपनी आता थेट बिजनेसला टार्गेट करत असून बिजनेसद्वारे, सामान्य युजर्सची खरेददारी आणि बिहेविअरही ट्रॅक करण्याचा प्रयत्न करत आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Whatsapp, Whatsapp News

  पुढील बातम्या