Whatapp ला नवा पर्याय; जाणून घ्या काय आहे Signal App

Whatapp ला नवा पर्याय; जाणून घ्या काय आहे Signal App

व्हॉट्सअ‍ॅपच्या (Whatsapp) नव्या पॉलिसीमुळे अनेक युजर्स सिग्नल या अ‍ॅपकडे वळत असल्याचं चित्र आहे. व्हॉट्सअ‍ॅप नवी प्रायव्हसी पॉलिसी (Privacy Policy) आणत असल्याने, युजर्स सध्या व्हॉट्सअ‍ॅपला चांगला पर्याय ठरु शकेल अशा अ‍ॅपच्या शोधात आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 जानेवारी : सिग्नल (Signal) हा एक क्रॅास प्लॅटफार्म असून, तो जलद एनक्रिप्टेड मेसेजिंग सेवा (Messeging Service) देतो. सध्या व्हॉट्सअ‍ॅपच्या (Whatsapp) नव्या पॉलिसीमुळे अनेक युजर्स सिग्नल या अ‍ॅपकडे वळत असल्याचं चित्र आहे. व्हॉट्सअ‍ॅप नवी प्रायव्हसी पॉलिसी (Privacy Policy) आणत असल्याने, युजर्स सध्या व्हॉट्सअ‍ॅपला चांगला पर्याय ठरु शकेल अशा अ‍ॅपच्या शोधात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर सिग्नल या अ‍ॅपला युजर्सची पसंती मिळू लागली आहे.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (Alon Musk) यांनी या अ‍ॅपला दुजोरा दिल्याने, सिग्नल अ‍ॅपच्या युजरबेसमध्ये वाढ होताना दिसून येत असल्याचं मनीकंट्रोलने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. युजर्सचा सिग्नल अ‍ॅप (Signal app) डाऊनलोड करण्याकडे कल वाढत असल्याने या अ‍ॅपची सर्व्हर यंत्रणा हा वाढता ताण पेलू शकत नव्हती, त्यामुळे युजर्सला व्हेरिफिकेशन कोड येण्यास काहीसा उशीर होत होता. परंतु, आता या समस्येचं निराकरण करण्यात आलं आहे.

(वाचा - WhatsAppमध्ये मोठी त्रुटी!Googleवर कोणीही शोधू शकतं तुमचा फोटो, जॉईन करतात ग्रुप)

काय आहे Signal app?

सिग्नल हा इनक्रिप्टेड मेसेजिंग सर्व्हिससाठीचा एक पर्यायी प्लॅटफार्म असून, हे अ‍ॅप अँड्रॉईड, आयओएस आणि विंडोजवर उपलब्ध आहे. हा प्लॅटफार्म एक मोफत सॉफ्टवेअर अ‍ॅप्लिकेशन (Software Application) आहे. या माध्यमातून युजर्स एंड टू एंड इनक्रिप्टशनद्वारे मेसेज आणि फोटो, व्हिडीओ शेअर करू शकतात. तसंच सिग्नल अ‍ॅपच्या माध्यमातून ऑडिओ (Audio) आणि व्हिडीओ कॉल्स (Video Calls) देखील करता येऊ शकतात. व्हॉट्सअ‍ॅपप्रमाणेच सिग्नल अ‍ॅपद्वारे युजर्स लिंक्स, फोटो, व्हिडीओ पाठवू शकतात.

सिग्नल, व्हॉट्सअ‍ॅपप्रमाणेच तुमच्या फोनमधील कॉन्टॅक्टचा (Contacts) वापर करतो. त्यानंतर इंटरनेटचा वापर करुन युजर्स वैयक्तिक किंवा ग्रुपवर मेसेजेस पाठवू शकता. सिग्नल तुमचे मेसेज किंवा कॉल्स अक्सेस करु शकत नाही.

(वाचा - फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप विरोधात व्यापारी संघटना; CAIT ने सरकारला लिहिलं पत्र)

`सिग्नल`चा वापर मोफत करु शकतो का?

सिग्नलचा वापर अगदी मोफत करता येतो. युजर्स आपल्या मोबाईलमध्ये सिग्नल हे डिफॉल्ट मेसेजिंग अ‍ॅप म्हणून वापरु शकतात. मात्र यासाठी मोबाईलच्या कॉलिंग आणि डेटा प्लॅननुसार मेसेजकरिता शुल्क आकारले जाऊ शकते.

`सिग्नल`वर ग्रुप काल करता येतो का?

युजर्स सिग्नल अ‍ॅपद्वारे ग्रुप कॉलिंग (Group Calling) करु शकता. त्यासाठी 150 मेंबर्सची मर्यादा आहे.

सिग्नलचे प्रायव्हसी फीचर्स काय आहेत?

सिग्नलमध्ये स्क्रिन लॉक, रिले कॉल्ससारखे अत्यंत कमी प्रायव्हसी फीचर्स आहेत. सिग्नल वापरणारे युजर्स, मेसेज पाठवताना वेबसाईटवरील लिंक प्रिव्हीव्यू ऑफ करू शकतात. ज्यांनी आपल्याला सिग्नलवर मेसेज पाठवला आहे, त्यांना आपण तो वाचला आहे हे कळू नये यासाठी युजर्स रिड रिसिपंट हा ऑप्शन बंद करु शकतात. जर तुम्ही सिग्नलवरील रिले कॉल्स हा ऑप्शन सुरू केला तर, तुमचा आयपी अ‍ॅड्रेस कोणलाही न समजता कॉल्स करता येऊ शकतात. परंतु यामुळे तुमच्या कॉल्सच्या क्वॉलिटीवर परिणाम होऊ शकतो.

(वाचा - Whatsapp ला नवा पर्याय; भारतात गुगल प्ले स्टोरवर नंबर 1 फ्री App ठरलं Signal)

जर तुम्ही मेसेज टाईप करत असल्याचं दुसऱ्या व्यक्तीला समजू नये असं वाटत असेल, तर टर्न ऑफ इंडिकेटरचा वापर करू शकता. तसंच सिग्नल अ‍ॅपवरील अकाउंट सुरक्षित राहावे यासाठी युजर्स सिक्युरिटी कोडदेखील सेट करू शकतात. परंतु, हा कोड जर युजर्स विसरले, तर त्याची रिकव्हरी होत नाही. तुमचा फोन आणि सिग्नल अ‍ॅप कोणीही वापरु नये यासाठी स्क्रिन लॉकचं फीचरही देण्यात आलं आहे.

सिग्नल युजर्सचा डेटा जमा करते का?

सिग्नल अ‍ॅपच्या प्रायव्हसी पॉलिसीनुसार, हे अ‍ॅप तुमच्या अकाउंटची माहिती जमा करते. सिग्नल अकाउंट सुरू करण्यासाठी फोनमधील कॉन्टॅक्टचा वापर केला जातो. कॉल्स करण्यासाठी किंवा मेसेज पाठवण्यासाठी ऑथेंटिकेशन टोकन, किज, पूश टोकन्स तसंच अन्य तांत्रिक माहिती युजर्सच्या मोबाईलमधून घेतली जाते. सेवा देण्यासाठीच ही अतिरिक्त तांत्रिक माहिती घेतली जात असल्याचं `सिग्नल`ने म्हटलं आहे. तसंच युझर्सची कोणतीही वैयक्तिक माहिती, डेटा हा विकला किंवा भाडेतत्वावर दिला जात नाही किंवा त्यावर देखरेख ठेवली जात नसल्याचं `सिग्नल`ने स्पष्ट केलं आहे.

सिग्नलवरील चॅटचा बॅकअप गुगल ड्राईव्ह (Google Drive) किंवा आयक्लाऊडवर (iCloud) घेता येत नसल्याने सर्व चॅटस या युजर्सच्या मोबाईलमध्येच स्टोअर राहतात. जर युजर्सचा मोबाईल हरवला किंवा खराब झाला, तर हे चॅट्स पुन्हा मिळवता येत नाहीत.

Published by: Karishma Bhurke
First published: January 11, 2021, 10:33 PM IST

ताज्या बातम्या