नवी दिल्ली, 11 जानेवारी : किरकोळ व्यापाऱ्यांची संघटना कंफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (Confederation of All India Traders) सरकारला इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप (WhatsApp) आणि फेसबुकवर (Facebook) बंदी आणण्याची रविवारी मागणी केली आहे. कॅटने (CAIT) माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.
व्हॉट्सअॅप प्रायव्हसी पॉलिसी -
कॅटने व्हॉट्सअॅपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीबाबत चिंता व्यक्त करत, ही नवी पॉलिसी लागू करण्यापासून रोखण्याचं किंवा व्हॉट्सअॅपवर पूर्णपणे बंदी आणण्याचं म्हटलं आहे.
देशाच्या सुरक्षेसाठी धोका -
कॅटने पत्रात लिहिलं की, सरकारने व्हॉट्सअॅपला नवी पॉलिसी लागू करण्याबाबत थांबवावं किंवा व्हॉट्सअॅपवर बंदी आणावी. भारतात फेसबुकचे 20 कोटीहून अधिक युजर्स आहेत आणि प्रत्येक युजरच्या डेटापर्यंत पोहचण्यासाठी सक्षम केल्यास, केवळ अर्थव्यवस्थाच नाही, तर देशाच्या सुरक्षेसाठीही गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
काय आहे WhatsApp ची नवी पॉलिसी -
व्हॉट्सअॅपने आपली प्रायव्हसी पॉलिसी अपडेट केली आहे. ही पॉलिसी 8 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. यात व्हॉट्सअॅपने युजर्सचा डेटा कसा प्रोसेस आणि तो फेसबुकशी कसा शेअर करणार हे सांगितलं आहे. व्हॉट्सअॅप सुरू ठेवण्यासाठी युजर्सला नवी पॉलिसी (New Terms and Policy) मान्य करावी लागेल.
दरम्यान, WhatsApp च्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नव्या अपडेटमुळे युजर्सची प्रायव्हसी संपुष्ठात येणार नाही. कंपनी आजही युजर्सच्या प्रायव्हसीबाबत वचनबद्ध आहे. नव्या अपडेटमुळे फेसबुक आणि व्हॉट्सअॅपच्या डेटा शेअरिंगबाबत कोणताही बदल होणार नाही. कोणत्याही युजरचं प्रायव्हेट चॅट पब्लिक होणार नाही. ज्याने युजर्सचा बिझनेस वाढेल, केवळ तिचं माहिती फेसबुकवर (Facebook) दिली जाईल, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Whatsapp, WhatsApp chats