जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Android फोनमध्ये होणार मोठा बदल; बॅकग्राउंड Apps आपोआप बंद होणार

Android फोनमध्ये होणार मोठा बदल; बॅकग्राउंड Apps आपोआप बंद होणार

Android फोनमध्ये होणार मोठा बदल; बॅकग्राउंड Apps आपोआप बंद होणार

सध्या कोणतंही ऍप स्वाईप करुन रिसेंट स्क्रिनमधून घालवता येतं. नव्या सिस्टममध्ये गुगल कदाचित युजर्सना कोणते ऍप्स हायबरनेशनमध्ये जावेत ते सांगेल.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 13 जानेवारी : गुगल (Google) अँड्रॉईड आणि अँड्रॉईड 12 च्या नव्या हायबरनेशन फीचरवर काम करत असल्याचं बोललं जात आहे. हायबरनेशन फीचर (hibernation feature) पहिल्यांदा XDA Developers ने शोधलं होतं. हे फीचर युजर्सना बॅकग्राउंडमध्ये सुरू असलेले अ‍ॅप बंद करण्यास परवानगी देईल. Android Open Source Project (AOSP) मध्ये या ऍपचे ठसे आढळले. हे अ‍ॅप बॅटरीची क्षमता वाढवण्यास मदत करेल. तसंच मूळ उपकरणाची सुरक्षा वाढवण्यासही मदत करेल, अशी माहिती आहे. या नव्या ऑपरेटिंग सिस्टमचं नाव अद्याप समोर आलं नाही. या वर्षाच्या मार्चपर्यंत अँड्रॉईड 12 चा पहिला प्रिव्ह्यू जाहीर होण्याची शक्यता आहे. अँड्रॉईडमध्ये हायबरनेशन आधीपासून अस्तित्वात आहे. परंतु हे सध्या डेव्हलपर्सच्या आणि OS च्या हातात आहे. सध्या कोणतंही अ‍ॅप स्वाईप करुन रिसेंट स्क्रिनमधून घालवता येतं. नव्या सिस्टममध्ये गुगल कदाचित युजर्सना कोणते ऍप्स हायबरनेशनमध्ये जावेत ते सांगेल, म्हणजेच नको असलेले अ‍ॅप बंद होतील. बॅकग्राउंडमध्ये सुरू असलेले ऍप्स मेमरी कमी करतात. ते बॅटरी लाईफ कमी करतात आणि फोनही स्लो करतात. परंतु नव्या हायबरनेशन सिस्टम मोडमध्ये एखादं अ‍ॅप बंद करण्यास आणि बॅटरीचं लाईफ वाढवण्यास मदत करतं. 4 जीबी पेक्षा कमी रॅम असलेल्या फोनमध्येही या फीचरचा वापर करता येणार आहे. hibernate feature आपोआप ऍप्स बंद करेल की युजर्सला एखादा टायमर सेट करावा लागेल याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता XDA developers कडून देण्यात आलेली नाही. परंतु कंपनीने, आम्ही शाओमी सारख्या कंपन्यांच्या अँड्रॉईडप्रमाणे, बॅटरी सेव्हर ऍप्ससारखं आणण्याबाबत सांगितलं आहे. गुगलला, अँड्रॉईडवर इतर अ‍ॅप स्टोअर, त्याच्या पुढील आवृत्तीसह चालवणं सोपं करणंही अपेक्षित आहे. कंपनीने अँड्रॉईड डेव्हलपर्स ब्लॉगवरील एका पोस्टमध्ये सांगितलं होतं की, हा अनेक डेव्हलपर्सकडून मिळालेल्या प्रतिक्रियांचा भाग होता. या hibernate feature उपायांबाबत सावधगिरी बाळगली जाईल असंही गुगलने म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात