Home /News /technology /

फोटो एडिटिंगपासून ते मेसेज रिअ‍ॅक्शनपर्यंत; आता WhatsApp देणार हे जबरदस्त फीचर्स

फोटो एडिटिंगपासून ते मेसेज रिअ‍ॅक्शनपर्यंत; आता WhatsApp देणार हे जबरदस्त फीचर्स

मेसेज रिअ‍ॅक्शन ते फोटो एडिटिंगपर्यंत WhatsApp चे नवे फीचर्स समोर आले असून त्यांचं टेस्टिंग सुरू आहे.

  नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर : इन्स्टंट मेसेजिंग App WhatsApp आपल्या युजर्ससाठी नवनवे फीचर्स आणत असतं. मेसेज रिअ‍ॅक्शन ते फोटो एडिटिंगपर्यंत नवे फीचर्स समोर आले असून त्यांचं टेस्टिंग सुरू आहे. Message Reactions - Message reactions फीचर फेसबुक मेसेंजरमध्ये पाहिलं आहे. आता हे फीचर WhatsApp वरही येणार आहे. याद्वारे चॅटमध्ये येणाऱ्या मेसेजवर आवडीच्या इमोजीद्वारे रिअ‍ॅक्शन देता येईल. ही सुविधा ग्रुप चॅटमध्येही उपलब्ध आहे. चॅट बबल - WhatsApp चा वापर करताना युजर्सचा अधिकतर वेळ चॅट विंडोवर जातो. आता WhatsApp यासाठी नवं फीचर आणण्याच्या तयारीत आहे. चॅट विंडोमध्ये तुमच्या टेक्स्टच्या आसपास असलेला ग्रीन बबल अधिक चांगला होणार आहे. कंपनी एका अपडेटद्वारे याचं डिझाइन बदलेल.

  WhatsApp ची कारवाई; 20 लाखहून अधिक भारतीय युजर्सवर बॅन, सांगितलं हे कारण

  कॉन्टॅक्ट कार्ड - WhatsApp च्या Android App मध्ये चांगल्या डिझाइनचं कॉन्टॅक्ट कार्ड मिळणार आहे. मेसेजिंग App आपल्या ग्रुप कार्ड सेक्शनमध्ये ग्रुप व्हॉईस कॉल आणि ग्रुप व्हिडीओ आयकॉन जोडणार आहे. हे फीचर पर्सनल चॅटसाठी आधीपासूनच उपलब्ध आहे. नवं फीचर आल्यानंतर WhatsApp ओपन करुन ग्रुपच्या DP वर टॅप केल्यावर कॉलिंग आयकॉन दिसतील. त्यासाठी ग्रुपमध्ये जाण्याची गरज लागणार नाही. फोटो एडिटिंग टूल - WhatsApp एका फोटो एडिटर टूलवर काम करत आहे. हे WhatsApp Stories मध्ये मिळणाऱ्या एडिटिंग टूलसारखंचं असेल. युजर्स फोटोवर स्टिकर्स लावण्यासह आपल्या हिशोबाने क्रॉपही करू शकतील. त्याशिवाय फोटोवर टेक्स्ट आणि इमोजीही लावता येतील.

  Amazon-Flipkartच्या Online Shopping मध्ये खरेदी वस्तू खराब निघाली?इथे करा तक्रार

  दरम्यान, WhatsApp आपल्या प्लॅटफॉर्मवर लवकरच आणखी एक नवं फीचर जोडणार आहे. हे नवं फीचर व्हॉईस मेसेजबाबतचं असणार आहे. या फीचरद्वारे युजर्स App बंद केल्यानंतरही आलेला मेसेज पूर्ण ऐकू शकतील. इन्स्टंट मेसेजिंग App WhatsApp, Voice Message हे फीचर अधिक चांगलं करण्यासाठी प्रयत्न करत आहे. रिपोर्टनुसार, WhatsApp नव्या फीचरवर काम करत आहे, ज्याचं नाव ग्लोबल व्हॉईस मेसेज प्लेअर असं असेल. या फीचरचा वापर युजर्स MP3 प्लेअरप्रमाणे करू शकतात. युजर्स चॅट बंद करुनही व्हॉईस मेसेज ऐकू शकतात. त्याशिवाय चॅट ओपन नसताना व्हॉईस मेसेज युजर्स सहजपणे बंदही करू शकतात. याधी Voice Message आल्यानंतर युजर्सला त्याच चॅटमध्ये तो ऐकावा लागत होता. आता चॅटमधून बाहेर पडूनही ते ऐकता येईल.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Tech news, Whatsapp chat, Whatsapp New Feature, WhatsApp user

  पुढील बातम्या