नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप (WhatsApp) आणि इन्स्टाग्रामने (Instagram) नवीन आयटी नियमांतर्गत कठोर कारवाई सुरू केली आहे. त्याअंतर्गत ऑगस्ट 2021 दरम्यान व्हॉट्सअॅपने 20 लाखहून अधिक भारतीय युजर्सला बॅन केलं होतं. तर फेसबुकने कोट्यवधी युजर्सला आपल्या प्लॅटफॉर्मवरुन हटवलं होतं. इन्स्टाग्रामनेही 20 लाखहून अधिक युजर्स हटवले होते.
WhatsApp ने 16 जून ते 31 जुलैदरम्यान 594 तक्रारी मिळाल्यानंतर 3,027,000 भारतीय युजर्सचे अकाउंट्स बंद केले होते. 95 टक्के प्रकरणांत स्पॅम मेसेजेसमुळे अकाउंट्स बॅन केल्याचं व्हॉट्सअॅपने सांगितलं. जागतिक स्तरावर WhatsApp ने एका महिन्यात जवळपास 80 लाख अकाउंट्स बॅन केले.
End-to-end encryption पॉलिसीमुळे युजर्सचे मेसेज पाहता येत नाहीत. अशात युजर्सची सुरक्षा लक्षात घेता अकाउंट्सकडून मिळणारे संकेत, एन्क्रिप्शनशिवाय काम करणारे फीचर्स आणि युजर्सकडून करण्यात आलेले रिपोर्ट्स या आधारावर निर्णय घेतला जातो. नव्या आयटी नियमांनुसार, सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला दर महिन्याला कंप्लायन्स रिपोर्ट द्यावा लागतो.
फेसबुक-इन्स्टाग्रामवर इतक्या तक्रारी -
WhatsApp रिपोर्टनुसार, ऑगस्टदरम्यान अकाउंट्स सपोर्ट (105), बॅन अपील (222), इतर सपोर्ट (34), प्रोडक्ट सपोर्ट (42) आणि सेफ्टी (17) मध्ये 420 यूजर रिपोर्ट मिळाले. तर Facebook ने ऑगस्ट 2021 दरम्यान नियमांच्या उल्लंघनाच्या 10 कॅटेगरीमध्ये 3.17 कोटी सामग्रीविरोधात कारवाई केली गेली. ऑगस्टमध्ये इन्स्टाग्रामने 9 वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये 22 लाख कंटेंट प्लॅटफॉर्मवरुन रिमूव्ह केला.
अशाप्रकारच्या कंटेंटवर कारवाई -
कंप्लायन्स रिपोर्टनुसार, तीन कोटीहून अधिक कंटेंटमध्ये स्पॅम 2.9 कोटी, हिंसा 26 लाख, अडल्ट न्यूडिटी आणि सेक्शुअल अॅक्टिविटी 20 लाख, हेट स्पीच 2,42,000 सह दुसऱ्या इतर मुद्द्यांशी संबंधित कंटेंट सामिल आहे, ज्यामुळे परिस्थिती खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा सर्व कंटेंटविरोधात कठोर कारवाई करत त्यांना प्लॅटफॉर्मवरुन हटवण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.