Home /News /technology /

Covid Vaccination In India : जगातील सर्वात मोठ्या लसीकरणासाठी फायदेशीर ठरलं Co-WIN App

Covid Vaccination In India : जगातील सर्वात मोठ्या लसीकरणासाठी फायदेशीर ठरलं Co-WIN App

भारताने कोरोना महामारीच्या विरोधात एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत भारतात 100 कोटी लोकांना लस देण्यात आली असून लसीकरणाचं हे काम अजूनही अविरतपणे चालू आहे.

    नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर : जगभरात कोरोनाने (Coronavirus) थैमान घातल्यानंतर भारतातही कोरोनामुळं लोकांना या संसर्गरोगाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी भारतातील प्रशासनव्यवस्था आणि लोकांनी अधिक जागरूकतेने काम करत लोकांना मदत पोहचवण्याचं काम केलं होतं. परंतु आता भारताने कोरोना महामारीच्या विरोधात एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत भारतात 100 कोटी (1 Billion Covid Vaccination In India) लोकांना लस देण्यात आली असून लसीकरणाचं हे काम अजूनही अविरतपणे चालू आहे. 16 जानेवारीला भारतात लसीकरणाला सुरूवात झाली होती. आता भारतातील लोकांना 100 कोटी डोस देऊन पूर्ण झालेले आहे. या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधितही केलं आहे. परंतु हा लसीकरणाचा हा मोठा टप्पा गाठताना सर्वात जास्त (CoWIN app useful for the worlds largest vaccination) मदत झाली ती कोविन अॅपची. अगदी तिसऱ्या ते चौथ्या क्लिकला प्रत्येक आपली लस बुक होत होती. इतक्या मोठ्या संख्येने लोकांनी एकाचवेळी लॉगिन केल्यानंतरही त्यावर काहीही प्रॉब्लेम अथवा एरर आला नाही. कारगाड्यांच्या ऑनलाइन बुकिंगचा ट्रेंड वाढला हे डिजिटल प्लॅटफॉर्म राष्ट्रीय आरोग्य पोर्टल(NHP) ने तयार केले होते. कोविड महामारीविरोधात लढण्यासाठी त्याला को-विन असं नाव देण्यात आलं होतं. त्यामुळं लसीकरणासाठी नोंदणी करायची असेल तर लोकांना कोविन प्लॅटफॉर्मवरचाच वापर करावा लागला होता. selfregistration.cowin.gov.in या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला मोबाईल क्रमांकासह नोंदणी करावी लागते. PM मोदी आणि गृहमंत्री अमित शाह कोणता स्मार्टफोन वापरतात? पुतिन आणि किम जोंग? त्यानंतर आपली प्रोफाइल तयार झाल्यानंतर आपल्याला लसीकरणासाठी नोंदणी करता येते. विशेष म्हणजे आपल्याला एकाच नंबरवर आपल्या कुटुंबातील सर्वांची लसीकरणासाठी नोंदणी करता येते. त्यामुळं कोरोना विरोधातल्या लढाईत हे अॅप फार प्रभावी ठरले आहे. या प्लॅटफॉर्मवरून लसीकरणासाठी नोंदणी करू करण्याबरोबर आपल्याला लसीकरणाचे प्रमाणपत्रही डाउनलोड करता येते. Reliance लवकरच आणणार JioPhone Next; दिवाळीच्या आधीच धमाका, जाणून घ्या फिचर्स कारण परदेशात शिक्षणासाठी आणि इतर प्रवाशांसाठी कोणतीही अडचण होऊ नये, यासाठी ती काळजी घेण्यात आली होती. त्यामुळं भारतात कोरोनाविरोधातल्या लढाईत आणि 100 कोटी लोकांना लसीकरण करण्याच्या या टप्यावर कोविन हे अॅप मोठं हत्यार ठरलं आहे.
    Published by:Atik Shaikh
    First published:

    Tags: Corona vaccination, India, PM Naredra Modi

    पुढील बातम्या