Women's Day Special: 'ती'च्या कार्याला अनोखा सलाम; आनंद महिंद्रांनी शेअर केला खास VIDEO
Women's Day Special: 'ती'च्या कार्याला अनोखा सलाम; आनंद महिंद्रांनी शेअर केला खास VIDEO
महिंद्रा कंपनीने महिला दिनादिवशी, ही जाहिरात शेअर करत महिलांच्या कार्याला, त्यांच्या मेहनतीला, कर्तुत्वाला सलाम करत केला असून शेतकऱ्यांच्या कष्टाला, त्यांच्या मेहनतीचाही गौरव करण्याचा प्रयत्न केला आहे.
मुंबई, 8 मार्च : आज जगभरात जागतिक महिला दिन (International Women's Day) साजरा केला जात आहे. या खास दिवशी आनंद महिंद्रा यांच्या महिंद्रा कंपनीच्या ट्रॅक्टरची एक जाहिरात चांगलीच व्हायरल होते आहे. या जाहिरातीमध्ये एक महिला पुरुषांच्या बरोबरीनेच कोणतंही काम करु शकते, अशी महिलांची कणखर, प्रखर प्रतिमा दाखवण्यात आली आहे. ही जाहिरात सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली असून या जाहिरातीचं, त्यात दाखवण्यात आलेल्या आशयाचं कौतुक होत आहे.
महिंद्रा ग्रुपच्या या जाहिरातीमध्ये, एक महिला ट्रॅक्टर चालवण्यासाठीचं लायसन्स मिळवण्यासाठी ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी येते असं दाखवण्यात आलं आहे. पण ही महिला असून ट्रॅक्टर कसा काय चालवू शकते, यापूर्वी कोणत्याही महिलेने ट्रॅक्टर चालवण्यासाठी टेस्ट दिली नसल्याचं तेथील अधिकारी सांगत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसतंय.
महिलेसाठी ट्रॅक्टर चालवणं सोपं नसून अशी टेस्टही देणंही 'आसान' नसल्याचं अधिकारी त्या तरुणीला सांगतोय. आतापर्यंत महिलेने टेस्ट दिल्याचं पाहिलं नसलं, तरी यापुढे पाहाल असं आत्मविश्वासाने सांगणारी तरुणी 'आसान होता तो तहर कोई किसान होता' असं ठाम, आत्मविश्वासाने उत्तर देते, आणि ट्रॅक्टरसाठीची टेस्ट पास करुनही दाखवते.
सोशल मीडियावर सतत ऍक्टिव्ह असलेल्या आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही महिला दिनानिमित्त महिंद्रा ट्रॅक्टर्सची विषेश जाहिरात शेअर केली आहे. केवळ एकच शब्द 'शक्ती' अशा कॅप्शनसह त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.
महिंद्रा कंपनीने महिला दिनादिवशी, ही जाहिरात शेअर करत महिलांच्या कार्याला, त्यांच्या मेहनतीला, कर्तुत्वाला सलाम करत केला असून शेतकऱ्यांच्या कष्टाला, त्यांच्या मेहनतीचाही गौरव करण्याचा प्रयत्न केला आहे.
Published by:Karishma
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.