नवी दिल्ली 19 नोव्हेंबर : जर युजर्सच्या स्मार्टफोनची चार्जिंग संपायला लागली असेल तर तो लगेचच चार्जर शोधायला लागतो. सतत स्मार्टफोनला चार्ज करत रहावं लागतं. परंतु आता 2024 पर्यंत चार्जर नसलेले स्मार्टफोन बाजारात (charge smartphone without charger) येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळं आता लवकरच युजर्सला चार्जरशिवाय स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे.
कारण आता European Union यासंदर्भात एक बिल (smartphones without chargers hit the market in 2024) पास केलं होतं. त्यात कॉमन चार्जरसंबर्भात चर्चा करण्यात आली होती. मात्र या योजनेमुळं ग्राहकांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Apple कंपनीच्या माजी कर्मचाऱ्याने iPhone चं पितळ पाडलं उघडं; सिक्रेट्स आले समोर
काही मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की Samsung आणि Apple या कंपन्या Galaxy S21 आणि iPhone 12 या सिरीजमधून चार्जर हटवण्यावर काम करत आहे. त्यामुळं आता स्मार्टफोन, ई-बुक रीडर, वायरलेस चार्जर, Wireless Earbuds, पोर्टेबल स्पीकर आणि चार्जरच्या किंमतींवर याचा प्रभाव पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
बटाटा विक्रेत्याची कमाल! VIP मोबाईल नंबरसाठी मोजले इतके लाख; 3 iPhone एवढी किंमत
दरम्यान आता Samsung कंपनीनं Galaxy S21 या स्मार्टफोन्स सिरीजला चार्जरशिवाय विकायला सुरूवात केली आहे. जेव्हा (how to charge phone without charger) आयफोन 11 ला लॉन्च करण्यात आलं होतं त्यावेळीही ते चार्जरशिवाय देण्यात आलं होतं. त्यामुळं आता आगामी या योजनेमुळं ग्राहकांच्या मागणीवर आणि त्यांच्या खरेदीवर याचा परिणाम पाहायला मिळणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Apple, Samsung, Smartphones