नवी दिल्ली, 23 सप्टेंबर : आता लवकर थेट उडणारी कार Flying car पाहायला मिळणार आहे. अमेरिकेतील फेडरल एविएशन अॅडमिनिस्ट्रेशनने फ्लाइंग कार उडवण्यासाठी परवानगी दिली आहे. अनेक कंपन्या या प्रोजेक्टवर काम करत आहेत. आता भारतातील विनाटा एयरोमोबिलिटी (Vinata Aeromobility) कंपनीचं नावही या लिस्टमध्ये सामिल झालं आहे. चेन्नई येथील स्टार्टअप कंपनी हायब्रिड फ्लाइंग कारची (Hybrid Flying Car) निर्मिती करत आहे.
भारतातील पहिल्या फ्लाइंग कारचं कॉन्सेप्ट मॉडेल तयार करण्यात आलं असून याचा आढावा घेण्यात आला आहे. कंपनीने पहिल्यांदा कारचं मॉडेल नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिंया (Jyotiraditya Scindia) यांना दाखवलं आहे.
ज्योतिरादित्य सिंधिंया यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी Vinata Aeromobility च्या टीमची भेट घेतली आणि फ्लाइंग कारची तपासणी केली. त्यांनी आशियातील पहिल्या हायब्रिड फ्लाइंग कारचा योग्यरित्या आढावा घेण्यात आल्याचं सांगितलं. ज्यावेळी ही पूर्णपणे तयार होईल, त्यावेळी लोकांसह सामानाचीही याद्वारे वाहतूक होईल. त्याशिवाय मेडिकल इमरजेन्सीसाठीही याची मदत होईल.
कंपनीने आपल्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर 14 ऑगस्ट रोजी 36 सेकंदाचा एक व्हिडीओ अपलोड केला होता. त्या व्हिडीओनुसार, ही कार 5 ऑक्टोबर रोजी लंडनमध्ये लाँच केली जाऊ शकते. Flying car च्या किंमतीबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
Delighted to have been introduced to the concept model of the soon-to-become Asia’s First Hybrid flying car by the young team of VINATA AeroMobility: Civil Aviation Minister Jyotiraditya Scindia (1/2) pic.twitter.com/Jqtz9gbikk
— ANI (@ANI) September 20, 2021
काय आहे हायब्रिड कार?
Hybrid Car एका सामान्य कारप्रमाणेच दिसते. पण यात दोन इंजिनचा वापर केला जातो. यात पेट्रोल-डिझेल इंजिनसह इलेक्ट्रिक मोटरही असते. याला हायब्रिड म्हटलं जातं. सध्या अनेक कंपन्या अशाप्रकारच्या कार्सवर काम करत आहेत. Made in India फ्लाइंग कार विजेसह बायो फ्यूलवरही चालेल, जेणेकरुन याच्या फ्लाइंग कॅपेसिटीला वाढवता येईल. याच्या कॅपेसिटीबाबत सध्या कोणतीही माहिती नाही. कंपनीने ज्योतिरादित्य सिंधिंया यांना दाखवलेल्या कॉन्सेप्टनुसार या कारमध्ये दोन प्रवासी जाऊ शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Car