Home /News /technology /

आता उडताना दिसणार Flying Car! विमानतळांदरम्यान चाचणी उड्डाण यशस्वी

आता उडताना दिसणार Flying Car! विमानतळांदरम्यान चाचणी उड्डाण यशस्वी

फ्लाईंग कारने स्लोव्हाकियातील नायट्रा आणि ब्रॅटिस्लावा येथे आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान 35 मिनिटांचं उड्डाण पूर्ण केलं आहे.

  नवी दिल्ली, 30 जून: मागील अनेक दिवसांपासून फ्लाईंग कार (Flying Car) हायब्रीड कार-एअरक्राफ्टची (Hybrid Car) चर्चा सुरू होती. आता या फ्लाईंग कारने विमानतळादरम्यान चाचणी उड्डाण यशस्वीपणे पूर्ण केलं आहे. फ्लाईंग कारने स्लोव्हाकियातील (Slovakia) Nitra आणि ब्रॅटिस्लावा (Bratislava) येथे आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान 35 मिनिटांचं उड्डाण पूर्ण केलं आहे. हायब्रीड कार-एअरक्राफ्ट बीएमडब्ल्यू इंजिनसह सुसज्ज असून ही रोजच्या पेट्रोल इंधनावर चालते. या कारचे निर्माते स्टीफन क्लेन यांनी ही कार 8200 फूट उंचीवर जवळपास 1000 किलोमीटर उडू शकेल असं सांगितलं आहे. तसंच आतापर्यंत या कारने 40 तास हवेत घालवले असल्याचंही ते म्हणाले. ही कार 2 मिनिटं 15 सेकंदात कारमधून एअरक्राफ्टमध्ये रुपांतरित होते. या कारमधून 2 लोक जाऊ शकतात. जवळपास एकूण 200 किलोपर्यंत वजन ही कार घेऊ शकते. या फ्लाईग कारचा अनुभव शेअर करताना क्लेन यांनी या कारचं उड्डाण ताशी 170 किमी वेगाने झालं. हा अनुभव अतिशय आनंददायी असल्याचं ते म्हणाले.

  (वाचा - कोणी उपाशी राहू नये यासाठी Google चं पाऊल, जेवण सर्च करण्यास गरजूंना होणार मदत)

  या फ्लाईंग कारबाबत मार्केटमध्ये मोठ्या अपेक्षा आहेत. 2019 मध्ये सल्लागार कंपनी मॉर्गन स्टेनलीने 2040 पर्यंत या क्षेत्राची किंमत 1.5 ट्रिलियन होण्याची शक्यता वर्तवली आहे. केवळ एकट्या अमेरिकेत 40000 या एअरक्राफ्टच्या ऑर्डर्स असल्याचं सांगण्यात आलं आहे. हुंदाई मोटर युरोपचे प्रमुख मायकल कोल यांनी ही संकल्पना आमच्या भविष्यातील एक भाग असल्याची आशा व्यक्त केली आहे. सध्याच्या वाहतुकीच्या पायभूत सुविधांवरील ताण हे यामागे संभाव्य उपाय असल्याचं मानलं जात आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Autorickshaw driver, Car, Tech news, Technology

  पुढील बातम्या