मुंबई, 01 नोव्हेंबर: सध्या कार आणि दुचाकीची बाजारपेठ आणि एकूण खरेदी यामध्ये वेगानं तेजी येत आहे. इतकच नाही तर त्यामध्ये अनेक बदल आणि नवीन मॉडेल्स येत असल्याचं पाहायला मिळत आहे. पण अशा एक तयार करण्यात आली आहे जी कारचं थेट विमानात रुपांतर करते. विश्वास बसणार नाही काही वेळा वाटेल ही अॅनिमेटेड फिल्म किंवा सीन असेल पण नाही अशी कार प्रत्यक्षात तयार करण्यात आली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हे वाचा- ‘OLX पर बेच दे…’ म्हणत एकच गाडी 12 वेळा विकली; आणि… अवघ्या तीन मिनिटांमध्ये कारचं विमानात रुपांतर होणारा हा व्हिडीओ आतापर्यंत 77 हजार हून अधिक लोकांनी पाहिला आहे. Klein Vision कंपनीद्वारे ही लेटेस्ट व्हर्जन असलेली फाइंग कार तयार करण्यात आली आहे. कमर्शियल टॅक्सीसोबत सेल्फ ड्रायव्हिंग या कारमध्ये असल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर काही युझर्सनी ही भविष्यातली कार अशी असेल असा अंदाज व्यक्त केला आहे. 6 महिन्यात ही कार बाजारात उपलब्ध होऊ शकते असा दावाही केला जात आहे.