मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Ola Air Pro: ओलाची 'उडती कार' दाखल! वाचा काय आहे 'त्या' Tweet चं सत्य

Ola Air Pro: ओलाची 'उडती कार' दाखल! वाचा काय आहे 'त्या' Tweet चं सत्य

'उडती कार' (flying car) हा फक्त सिनेमात पाहण्यापुरता अनुभव आता राहणार नाही तर तो लवकरच प्रत्यक्षातही अनुभवता येईल अशी चर्चा आज सुरु झाली होती. निमित्त झालं Ola च्या CEO चं Tweet

'उडती कार' (flying car) हा फक्त सिनेमात पाहण्यापुरता अनुभव आता राहणार नाही तर तो लवकरच प्रत्यक्षातही अनुभवता येईल अशी चर्चा आज सुरु झाली होती. निमित्त झालं Ola च्या CEO चं Tweet

'उडती कार' (flying car) हा फक्त सिनेमात पाहण्यापुरता अनुभव आता राहणार नाही तर तो लवकरच प्रत्यक्षातही अनुभवता येईल अशी चर्चा आज सुरु झाली होती. निमित्त झालं Ola च्या CEO चं Tweet

  • Published by:  News18 Desk

मुंबई,  1 एप्रिल : हवेत उडणाऱ्या कार ही फक्त रोहित शेट्टी (Rohit Shetty) याच्या सिनेमात हमखास दिसणारी बाब आहे.  'उडती कार' (flying car) हा फक्त सिनेमात पाहण्यापुरता अनुभव आता राहणार नाही तर तो लवकरच प्रत्यक्षातही अनुभवता येईल अशी चर्चा आज सुरू झाली होती. ओला कॅबचे (Ola Cabs)  संचालक आणि  सीईओ भावेश अग्रवाल (ola ceo Bhavish Aggarwal) यांनी गुरुवारी एक ट्वीट (Ola flying car ola airpro) केल्यानंतर याबाबतची चर्चा सुरू झाली होती.

काय होते ट्वीट?

भावेश अग्रवाल यांनी गुरुवारी दुपारी एक ट्वीट केले. त्यामध्ये जगातील पहिली आणि एकमेव पूर्ण स्वयंचलीत (Fully autonomous) इलेक्ट्रीक उडती कार (electric flying car) द ओला एअर प्रो (The Ola Airpro) याचे अनावरण झाल्याचं जाहीर केलं.

प्रतिक्रियांचा पाऊस

भावेश अग्रवाल यांचे हे ट्वीट अगदी कमी कालावधीमध्ये व्हायरल झाले. त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युझर्सनी या असमान्य कल्पनेचं स्वागत केलं आहे. लेखक चेतन भगत यांनी तर  'मी या कारची खिडकी उघडी ठेवू शकतो का?' असा प्रश्न विचारला. मला ताजी हवा घ्यायला आवडेल त्याचबरोबर मला गाणे देखील लावायची आहे. संगीत असल्याशिवाय मजा येणार नाही, असे भगत यांनी म्हंटले आहे. एका युझरने तर आम्ही Ola AirPro Max Plus ची वाट पाहू असे जाहीर केले.  कवी प्रितीश नंदी यांनी देखील याबाबत ओला कंपनीचं अभिनंदन केलं आहे.

काय आहे सत्य?

ओला कंपनीच्या olaairpro.com या साईटवर या नव्या उडत्या कारची माहिती दिली आहे. ही माहिती वाचल्यानंतर हा सर्व प्रकार काय आहे, हे लक्षात येते. ही कार चालवण्यासाठी ड्रायव्हरला कोणत्याही लायसन्सची गरज नाही, असे कंपनीनं स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर आणखी देखील काही वैशिष्ट्य कंपनीनं यामध्ये सांगितली आहेत. ती वाचल्यानंतर हा सर्व 'एप्रिल फुल' (April Fool) चा प्रकार असल्याचं लक्षात येतं.

( वाचा : कामाचा मोबादला म्हणून कंपनीनं दिली चंद्रावर जमीन, तरुणाचा आनंद गगनात मावेना )

दरवर्षी 1 एप्रिल हा दिवस एप्रिल फुल डे (April Fool's Day) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी वेगवेगळ्या विनोदाच्या माध्यमातून एकमेकांची थट्टा केली जाते. ओला कंपनीचे सीईओ भावेश अग्रवाल यांचे हे ट्विट देखील याच एप्रिल फुलचा भाग आहे. ओला कंपनीनं यापूर्वी देखील 1 एप्रिलला या प्रकारचे विनोद केलेला आहे. विनोदाची हीच परंपरा कंपनीनं यावर्षी देखील सुरु ठेवली आहे.

त्यामुळे ओला कंपनीची 'उडती कार' येणार हे एप्रिल फुल आहे. या कार आपल्याला आणखी काही वर्ष तरी रोहित शेट्टी किंवा अन्य दिग्दर्शकांच्या सिनेमातच पाहावी लागणार आहे.

First published:

Tags: CEO, Social media viral, Tweet, Viral