Home /News /technology /

हे 20 Apps सर्वाधिक संपवतात फोन बॅटरी, कामाचे नसतील तर लगेच डिलीट करा

हे 20 Apps सर्वाधिक संपवतात फोन बॅटरी, कामाचे नसतील तर लगेच डिलीट करा

तज्ज्ञांनी काही अशा Apps ची लिस्ट तयार केली आहे, ज्यात बॅटरीची सर्वाधिक आवश्यकता असते. असे काही Apps आहेत, जे तुमच्या फोनची बॅटरी सर्वाधिक संपवतात.

  नवी दिल्ली, 10 मे : अनेक स्मार्टफोन युजर्स (Smartphone Users) लवकर बॅटरी संपत असल्याच्या समस्येने त्रस्त असतात. बॅटरी लाइफ वाढवण्यासाठी अनेक छोट्या-मोठ्या ट्रिक अनेकजण वापरत असतात. जर तुम्हालाही अशी समस्या येत असेल, तर तुमच्या फोनमधील Apps तपासण्याची गरज आहे. pCloud तज्ज्ञांनी काही अशा Apps ची लिस्ट तयार केली आहे, ज्यात बॅटरीची सर्वाधिक आवश्यकता असते. असे काही Apps आहेत, जे तुमच्या फोनची बॅटरी सर्वाधिक (Low Battery) संपवतात. अशी अनेक कारणं आहेत, जी Apps ला बॅटरी-किलर बनवतात. केवळ डार्क मोड ऑप्शनची कमी किंवा कॉम्पलेक्स बॅकग्राउंड फीचर्समुळे Apps ची एफिशियन्सी कमी होऊ शकते. लोकेशन बेस्ड Apps अधिक डिमांडिंग असतात. सर्वाधिक बॅटरी संपवणाऱ्या लिस्टमध्ये सर्वात वर फिटबिट App आहे. फिटबिट गुगलने 2021 रोजी खरेदी केलं होतं. App उपयोगमध्ये नसल्यासही 16 पैकी 14 फीचर चालवले जातात. फिटबिट App प्रत्येकवेळी कॅमेरा, लोकेशन, मायक्रोफोन आणि वायफाय कनेक्शन चालवतं.

  हे वाचा - Umang App: केवळ एका App द्वारे घेता येईल अनेक सरकारी सुविधांचा लाभ, असे होतील फायदे

  सोशल मीडिया आणि कम्युनिकेशन Apps चा अधिक वापर केला जातो. त्या Apps मुळे अधिक बॅटरी संपते. 20 सर्वाधिक बॅटरी खर्च करणाऱ्या Apps मध्ये 6 सोशल मीडिया Apps चा समावेश आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट, यूट्यूब, व्हॉट्सअॅप आणि लिंक्डइन बॅकग्राउंडमध्ये 11 अॅडिशनल फीचर चालवण्याची परवानगी देतात. यात फोटो, वायफाय, लोकेशन, मायक्रोफोनचा समावेश आहे. टॉप 10 बॅटरी सर्वाधिक खर्च करणारे Apps - Fitbit Facebook Instagram Uber Tinder Skype Bumble BIGO LIVE Airbnb Verizon

  हे वाचा - तुमच्या आजूबाजूला ट्रॅफिक, लाउड स्पीकरमुळे किती होतो आवाज? स्मार्टफोनवर Apps द्वारे असं तपासा

  त्याशिवाय दररोजच्या वापरातील इतरही अनेक Apps मुळे बॅटरी अधिक संपते. WhatsApp Snapchat Zoom Youtube Telegram Linkedin Amazon
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Apps, Smartphone, Tech news

  पुढील बातम्या