Home /News /technology /

तुमच्या आजूबाजूला ट्रॅफिक, लाउड स्पीकरमुळे किती होतो आवाज? स्मार्टफोनवर Apps द्वारे असं तपासा

तुमच्या आजूबाजूला ट्रॅफिक, लाउड स्पीकरमुळे किती होतो आवाज? स्मार्टफोनवर Apps द्वारे असं तपासा

तुमच्या आजूबाजूला किती आवाज आहे हे जाणून घेण्यासाठी स्मार्टफोन तुमची मदत करू शकतो. त्यासाठी काही Apps डाउनलोड करावे लागतील. त्यावर तुमच्या आजूबाजूला किती आवाज आहे याची माहिती करुन घेता येईल.

  नवी दिल्ली, 08 मे : अनेकदा रस्त्यांवर नो हॉर्नचा बोर्ड पाहायला मिळतो. हा बोर्ड काही विशेष रस्ते किंवा भागांसाठी असतो. हॉर्न, गाड्यांचे आवाज किंवा इतर आवाजामुळे त्रास होऊ शकतो. जगभरात दरवर्षी अनेकांना बहिरेपणाचा सामनाही करावा लागतो. या मागचं कारण अनेकदा तुमच्या आजूबाजूला होणारा आवाजच असतो. परंतु अशा आवाजाकडे इतकं लक्ष दिलं जात नाही. तुम्ही ट्रॅफिकवाल्या रस्त्यावर असल्यास अनेक जण एकामागून एक हॉर्न वाजवताना दिसतात. सततचा हा आवाज, शिवाय ट्रेनचा आवाज, गाड्यांचा आवाज लोकांच्या बहिरेपणासाठी कारणीभूत ठरू शकतो. पण तुमच्या आजूबाजूला किती आवाज आहे हे जाणून घेण्यासाठी स्मार्टफोन तुमची मदत करू शकतो. त्यासाठी काही Apps डाउनलोड करावे लागतील. त्यावर तुमच्या आजूबाजूला किती आवाज आहे याची माहिती करुन घेता येईल. SPL Meter - हे App स्मार्टफोनच्या मायक्रोफोनच्या मदतीने साउंड लेवल मोजण्याचं काम करतो आणि ते SPL अर्थात साउंट प्रेशर लेवलमध्ये कन्व्हर्ट करतो. अँड्रॉइड आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर वापरता येतं. गुगल प्ले स्टोरवर या App ला 4 स्टार रेटिंग मिळालं आहे. Decibel X - हे App अँड्रॉइड आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर वापरता येतं. गुगल प्ले स्टोरवर या App ला 4 स्टार रेटिंग मिळालं आहे. या App च्या मदतीने तुम्ही तुमचा स्मार्टफोन साउंट लेवल मीटरमध्ये बदलू शकता. यामुळे 30 ते 120 dB पर्यंतची रेंज मोजता येते. यात तुम्हाला अनेक फीचर्स आणि सोपा यूजर इंटरफेस मिळतो. dB म्हणजे डेसिबल साउंट मोजण्याचं यूनिट आहे.

  हे वाचा - तुम्हीही Online Fraud चे बळी ठरला आहात का? चिंता नको; अशी करा रीतसर Complaint

  Sound Meter - हे App अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर वापरता येतं. गुगल प्ले स्टोरवर असलेलं हे App 4.8 Mb चं आहे. याच्या मदतीने साउंड लेवल मोजता येते. हे App देखील तुमच्या स्मार्टफोनमध्ये लावलेल्या मायक्रोफोनचा वापर करतं.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Tech news

  पुढील बातम्या