मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Smartphone चोरी झाला? या नंबरच्या मदतीने पुन्हा मिळवू शकाल, पाहा काय आहे IMEI Number

Smartphone चोरी झाला? या नंबरच्या मदतीने पुन्हा मिळवू शकाल, पाहा काय आहे IMEI Number

Found lost or stolen smartphone with imei number. फोन हरवल्याची किंवा चोरी झाल्याची पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलीस याच नंबरच्या मदतीने फोन ट्रेस करतात. त्यामुळे हा नंबर लक्षात ठेवणं फायद्याचं ठरतं किंवा हा नंबर सुरक्षित ठिकाणी सेव्ह करून ठेवू शकता.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 11 डिसेंबर : प्रत्येक मोबाइलची एक ओळख असते, जी मोबाइल कंपनी एका यूनिक नंबरद्वारे दाखवते. याला IMEI नंबर असं म्हटलं जातं. प्रत्येकाच्या फोनच्या सुरक्षेसाठी हा नंबर माहित असणं अत्यावश्यक असतं.

काय आहे IMEI नंबर?

International Mobile Equipment Identity हा एक 15 अंकी यूनिक नंबर असतो. प्रत्येक मोबाइल फोनचा हा नंबर वेगळा असतो. तुमच्या फोनच्या ओळखीसाठी हा अतिशय महत्त्वाचं नंबर असतो. फोन चोरी झाला किंवा हरवला, तर या IMEI नंबरची गरज लागते. फोन हरवल्याची किंवा चोरी झाल्याची पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलीस याच नंबरच्या मदतीने फोन ट्रेस करतात. त्यामुळे हा नंबर लक्षात ठेवणं फायद्याचं ठरतं किंवा हा नंबर सुरक्षित ठिकाणी सेव्ह करून ठेवू शकता.

हॅकर्स हा नंबर सहजपणे हॅक करू शकतात. IMEI नंबर हॅक करण्यासाठी हॅकर्स मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या अनधिकृत सॉफ्टवेअर्सचा वापर करतात. या सॉफ्टवेअर्सचा वापर करुन मोबाइलचा IMEI नंबर चेंज होतो आणि जुना नंबर ट्रेस करणं कठिण होतं.

फोन हरवला किंवा चोरी झालाय? IMEI नंबर असा करा ब्लॉक

त्यामुळे फोन हरवल्यास सर्वात आधी फोनचा संपूर्ण डेटा डिलीट करा. डेटा डिलीट करण्यासाठी अनेक Apps उपलब्ध आहेत. डेटा डिलीट केल्यास तुमची पर्सनल माहिती चोरी होणार नाही. तसंच फोन चोरी झाल्यास पोलिसांत तक्रार देणंही महत्त्वाचं आहे. पोलिसांत रिपोर्ट केल्यानंतर पोलीस मिसिंग सर्टिफिकेट देतील, त्याच्या मदतीने IMEI नंबर मिळवता येईल.

अँड्रॉईड फोनमध्ये हा IMEI Number मिळवण्यासाठी, मोबाईल फोनमध्ये एक कोड डायलपॅडमध्ये टाईप करुन कॉल बटण दाबावं लागेल. *#06# डायल करुन तुमच्या फोनचा IMEI Number मिळेल. तसंच अँड्रॉईड मोबाईल फोनमधील सेटिंग्जमध्ये About Phone वर क्लिक करुनही हा नंबर मिळू शकतो. फोनच्या पॅकेजिंगवरही हा नंबर असतो.

First published:

Tags: Smartphone, Tech news