मराठी बातम्या » फोटोगॅलरी » टेक्नोलाॅजी » फोन हरवला किंवा चोरी झालाय? IMEI नंबर असा करा ब्लॉक

फोन हरवला किंवा चोरी झालाय? IMEI नंबर असा करा ब्लॉक

जगभरात जवळपास 7 कोटीहून अधिक मोबाईल फोन्स हरवत असल्याची माहिती एका संशोधनातून समोर आली. या हरवलेल्या फोनमध्ये चोरी झालेल्या, एखाद्या ठिकाणी विसरलेल्या फोनचाही समावेश आहे. GPS लोकेशन आणि इंटरनेट एक्सेस न झाल्याने फोन मिळत नाही. आजकाल स्मार्टफोन म्हणजे केवळ फोटो, गाणी, व्हिडीओसाठी वापरला जात नाही, तर सर्वच खासगी डिटेल्स, कागदपत्र, बँक डिटेल्स फोनमध्ये ठेवले जातात. अनेक बँक खाती, सोशल मीडिया अकाउंट्सही फोनमध्ये सेव्ह असतात. अशात फोन हरवल्यानंतर या माहितीचाही गैरवापर होण्याची शक्यता असते. मोबाईल हरवल्यानंतर तो शोधण्यासाठी IMEI नंबरची आवश्यकता असते. या नंबरमुळे मोबाईल फोन ट्रॅक करण्यास मदत होते.