नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर : कोरोना काळात अनेकांना घरूनच काम करावं लागत असल्याने कामासाठी Laptop चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परंतु काम करत असताना अनेकदा Laptop स्लो चालतात किंवा हँग (laptop hanging problem and solution) होतात, अशा अनेकांच्या तक्रारी असतात. पण Laptop हँग होऊ नये आणि सुपरफास्ट चालावा यासाठी (Make superfast laptop using these tricks) काही ट्रिक्स फायदेशीर ठरू शकतात.
जेव्हा लॅपटॉप हँग होतो तेव्हा साधारणत: तो जुना Laptop असेल किंवा वॉर्न आऊट (laptop slow and hang) झालेला असेल. त्यासाठी Laptop ची काही विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. त्यामुळे तो सतत हँग न होण्यासह चांगलं वेगातही काम करू शकेल.
लॅपटॉप हँग होऊ नये यासाठी काय कराल?
- Recycling Bin ला सतत डिलीट करत रहा
अनेकदा लॅपटॉप हँग झाल्यावर युजर्सना वाटतं, की लॅपटॉपमधील स्पेस फुल झालेला असेल आणि त्यामुळे लॅपटॉप हँग होत असावा. परंतु तसं होत नाही. जेव्हा Laptop मधील अनावश्यक डाटा डिलीट केला जातो तेव्हा तो सर्व डाटा Recycling Bin मध्ये सेव्ह होत असतो. त्यामुळे Laptop स्लो किंवा हँग होऊ नये यासाठी सतत Recycling Bin मधील स्पेसला डिलीट करत राहा.
- Laptop ची योग्य वेळी Servicing
लॅपटॉप हा एक डिव्हाइस आहे. त्याच्या अतिवापरामुळे त्यात तांत्रिक अडचणी येण्याचीही शक्यता असते. त्यासाठी योग्यवेळी Laptop ची Servicing करायला हवी. जेणेकरून त्यातील हँगिंग आणि इतर टेक्निकल प्रॉब्लेम्सला टाळता येऊ शकतं.
- एकाचवेळी अनेक विंडोज ओपन करणं टाळा
Laptop वर काम करत असताना अनेक युजर्स एकाचवेळी अनेक विंडोज ओपन करून काम करत असतात. परिणामी लॅपटॉप स्लो आणि हँग होतो. त्यावेळी ज्या विंडोची गरज नसेल ती लगेच बंद करा. एकाच वेळी अनेक नव्या विंडो ओपन करू नका.
- Antivirus software
अनेकदा युजर्सला कळत न कळत अनेक व्हायरस लॅपटॉपमध्ये शिरतात. त्यावेळी Laptop स्लो होतो. त्यासाठी वेळोवेळो Antivirus software चा वापर करून लॅपटॉपच्या सुरक्षेत वाढ करता येऊ शकते. त्याचबरोबर Laptop च्या स्लो आणि हँग होण्याच्या समस्येवरही Antivirus software ने मात करता येऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tech news, Technology