मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

सावधान! Smartphone मध्ये हा Wallpaper चुकूनही ठेवू नका, Hacking चा धोका

सावधान! Smartphone मध्ये हा Wallpaper चुकूनही ठेवू नका, Hacking चा धोका

सायबर क्रिमिनल्सने Google Play Store वर Squid Game phone wallpaper App रुपात मालवेअर तयार करण्यात यश मिळवलं असल्याची माहिती समोर आली आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर : Netflix वरील Squid Game सीरिज अतिशय पॉप्युलर ठरत आहे. या सीरिजची क्रेझ इतकी वाढली, की अनेकजण आपल्या स्मार्टफोनवर याचे वॉलपेपर (Squid Game Wallpaper) ठेवत आहेत. तुम्हीही अशाप्रकारे वॉलपेपर ठेवला असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आवडत्या Squid Game चे वॉलपेपर ठेवणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. सायबर क्रिमिनल्सने Google Play Store वर Squid Game phone wallpaper App रुपात मालवेअर तयार करण्यात यश मिळवलं असल्याची माहिती समोर आली आहे.

अँड्रॉईड सिक्योरिटी रिसर्चरद्वारा ट्विटरवर @ReBensk या हँडलवरुन हे App शोधण्यात आलं. फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, महत्त्वाची बाब म्हणजे Google कडून या धोकादायक App चा शोध लागण्याआधीच Squid Game phone Wallpaper 4K HD App कमीत-कमी 5000 वेळा डाउनलोड करण्यात आलं आहे.

याबाबत माहिती मिळाल्यानंतर कंपनीकडून Google Play Store वर हे फेक App ब्लॉक करण्यात आलं आहे. Squid Game सीरिज फॅन्ससाठी हे वॉलपेपर App तयार करण्यात आलं होतं. इतकंच नाही, तर Squid Game संबंधी इतरही अनेक Android App तयार झाल्याची माहिती आहे.

तुमच्या Smartphone सोबत तुम्ही नकळत 100 हून अधिक वेळा करता ही एक गोष्ट

Squid Game च्या धोकादायक Wallpaper App मध्ये Android Joker मालवेअर आढळल्याची माहिती आहे. जोकर नावाचा मालवेअर धोकादायक असून हा मालवेअर 2017 मध्ये सर्वात आधी शोधण्यात आला होता.

सध्या नेटफ्लिक्सवरील स्क्विड गेम्स सीरिज अतिशय लोकप्रिय आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Google Play Store वर 200 हून अधिक स्क्विड गेम्स संबंधित Apps आहेत. हे Apps अधिकृत नसूनही 10 दिवसांत तब्बल 1 मिलियनहून अधिक वेळा इन्स्टॉल करण्यात आले आहेत. त्यामुळे Squid Game कितीही आवडती सीरिज असली, तरी यासंबंधी कोणतेही Apps डाउनलोड करताना सावधगिरी बाळगणं अतिशय गरजेचं आहे.

First published:

Tags: Apps, Google, Malware, Netflix