मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

कोण तपासतंय तुमचं Facebook Profile? या सोप्या टिप्स वापरून जाणून घ्या

कोण तपासतंय तुमचं Facebook Profile? या सोप्या टिप्स वापरून जाणून घ्या

एखाद्याचं फेसबुक प्रोफाइल्स आपण सर्रास तपासतो, पण काही जण त्यावरील माहितीचा दुरुपयोगही करू शकतात. म्हणूनच फेसबुकवर आपला माग कोण काढत आहे, हे कळण्याची सुविधा हवी असं अनेकांना वाटत असतं.

एखाद्याचं फेसबुक प्रोफाइल्स आपण सर्रास तपासतो, पण काही जण त्यावरील माहितीचा दुरुपयोगही करू शकतात. म्हणूनच फेसबुकवर आपला माग कोण काढत आहे, हे कळण्याची सुविधा हवी असं अनेकांना वाटत असतं.

एखाद्याचं फेसबुक प्रोफाइल्स आपण सर्रास तपासतो, पण काही जण त्यावरील माहितीचा दुरुपयोगही करू शकतात. म्हणूनच फेसबुकवर आपला माग कोण काढत आहे, हे कळण्याची सुविधा हवी असं अनेकांना वाटत असतं.

नवी दिल्ली, 30 एप्रिल: लॉकडाऊनमुळे घरी असल्या कारणाने अनेकांचा वेळ सोशल मीडियावर (Social Media) जातो. त्यात आजकाल अशी माणसं शोधणं कठीण आहे की जे फेसबुकवर नाहीत. फेसबुक (Facebook) अनेकांच्या रोजच्या जगण्याचा भाग झाला आहे. लॉकडाऊन काळात तर फेसबुक आणि एकंदरच सोशल मीडिया वापरात मोठी वाढ झाली. फेसबुकवरून लोकांचे मतप्रवाह, लोकांबद्दलची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. त्यावरून संबंधित व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज बांधला जातो. अगदी मोठमोठ्या कंपन्या नोकरीसाठी येणाऱ्या उमेदवारांच्या लिंक्डइन प्रोफाइलबरोबरच फेसबुक प्रोफाइल्सही पाहतात किंवा लग्न जुळवण्यापूर्वी किंवा अन्य काही कारणांसाठीही फेसबुक प्रोफाइल्स पाहण्याचं प्रमाण वाढलं आहे. काही जण त्या माहितीचा दुरुपयोगही करू शकतात. म्हणूनच फेसबुकवर आपला माग कोण काढत आहे, हे कळण्याची सुविधा हवी असं अनेकांना वाटत असतं.

(हे वाचा-Bank Fraud Alert: मोठ्या नुकसानीपासून वाचण्यासाठी या छोट्या गोष्टी लक्षात ठेवाच)

तुमच्या फेसबुक प्रोफाइलला कोणी भेट दिली, हे शोधून काढण्याचं एक नव्हे तर अनेक मार्ग आहेत. तुमच्या कोणत्या फेसबुक फ्रेंड्सनी तुमच्या फेसबुक प्रोफाइलला भेट दिली हे शोधून काढता येतं. अर्थात, त्या एफबी फ्रेंडने तुमचं प्रोफाइल कधी पाहिलं, हे मात्र यात कळत नाही.

अॅपल आयओएस (iOS) युजर्सना त्यांचं फेसबुक प्रोफाइल (Facebook Profile) कुणी पाहिलं, हे त्यांच्या प्रायव्हसी सेटिंग्जमधून शोधता येतं. अन्य युझर्सना फेसबुक डॉट कॉम ही वेबसाइट डेस्कटॉपवर ओपन करूनच ते पाहता येतं. तुमची फेसबुक टाइमलाइन (Facebook Timeline) कुणी पाहिली, हे कसंशोधून काढायचं याबाबत जाणून घ्या दोन पद्धती

आयओएस युजर्ससाठी ही पद्धत

फेसबुक प्रोफाइलला कुणी भेट दिली हे शोधून काढण्याचा ऑप्शन या युजर्ससाठी प्रायव्हसी सेटिंग्जमध्ये बराच आतमध्ये आहे. युजर्सना आधी फेसबुक सेटिंग्ज ओपन करावी. त्यानंतर प्रायव्हसी शॉर्टकट्समध्ये जावं. तिथे त्यांना “Who viewed my profile" (हू व्ह्यूड माय प्रोफाइल) हा पर्याय दिसेल. सध्या तरी हा पर्याय केवळ आयओएस फेसबुक अॅपमध्येच उपलब्ध आहे. फेसबुकने आयओएस युजर्ससाठी हा पर्याय 2018 मध्ये खुला केला. अँड्रॉइड युजर्सना अद्याप तरी हा पर्याय फेसबुक अॅपवर उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. अँड्रॉइड (Android) अॅप्लिकेशनमध्ये फेसबुक (Facebook) हा पर्याय कधी आणणार आहे, याची कल्पना नाही.

अँड्रॉइड युजर्स अशाप्रकारे तपासू शकतात

आयओएस युजर्स वगळता अन्य युजर्सना आपल्या फेसबुक प्रोफाइलला कुणी भेट दिली हे शोधून काढायचं असेल, तर त्यांना डेस्कटॉपवरून फेसबुक डॉट कॉम (Facebook.com) या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. या वेबसाइटवर गेल्यावर लॉगिन करावं. त्यानंतर होमपेजवर कुठेही राइट क्लिक करावं. त्यानंतर येणाऱ्या पर्यायांमधून व्ह्यू पेज सोर्स (View Page Source) या पर्यायावर क्लिक करावं. त्यानंतर फेसबुक होम पेजचा सोर्स कोड (Source Code) ओपन होईल.

(हे वाचा-संकटाच्या काळात सोशल मीडिया देतोय आधार )

त्यानंतर युजर्सनी “BUDDY_ID" हे सर्च करावं.  “BUDDY_ID" या प्रत्येक टॅगच्या पुढे 15 अंकी संख्या दिसेल. हा 15 अंकी आकडा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून प्रोफाइल आयडी असतो. कोणाचा? तर तुमच्या फेसबुक प्रोफाइलला भेट दिलेल्या प्रत्येक फेसबुक फ्रेंडच्या प्रोफाइलचा तो आयडी असतो. तो 15 आकडी आयडी कॉपी करावा. तुमच्या ब्राउझरमध्ये नवीन टॅब ओपन करावी. त्यानंतर  facebook.com/ असं टाइप करून त्यापुढे तो 15 आकडी प्रोफाइल आयडी टाकावा. त्यानंतर एंटर बटण दाबावं. असं केल्यावर तुमच्या त्या मित्राचं प्रोफाइल ओपन होईल, ज्याने तुमच्या प्रोफाइलला भेट दिली होती.

First published:

Tags: Facebook, Privacy, Tech news