मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Bank Fraud Alert: मोठ्या नुकसानीपासून वाचण्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवाच

Bank Fraud Alert: मोठ्या नुकसानीपासून वाचण्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवाच

अनेकदा ऑफर्स, काही मोफत किंवा स्वस्त दरात देण्याच्या बहाण्याने, ऑटीपी मागून, मेसेज-लिंक्सद्वारे बँक फ्रॉड झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. वाढत्या फ्रॉडमध्ये सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. यामुळे मोठं नुकसान टाळता येऊ शकतं.

अनेकदा ऑफर्स, काही मोफत किंवा स्वस्त दरात देण्याच्या बहाण्याने, ऑटीपी मागून, मेसेज-लिंक्सद्वारे बँक फ्रॉड झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. वाढत्या फ्रॉडमध्ये सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. यामुळे मोठं नुकसान टाळता येऊ शकतं.

अनेकदा ऑफर्स, काही मोफत किंवा स्वस्त दरात देण्याच्या बहाण्याने, ऑटीपी मागून, मेसेज-लिंक्सद्वारे बँक फ्रॉड झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. वाढत्या फ्रॉडमध्ये सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. यामुळे मोठं नुकसान टाळता येऊ शकतं.

नवी दिल्ली, 29 एप्रिल : कोरोना काळात ऑनलाईन व्यवहारात वाढ झाली असताना, दुसरीकडे ऑनलाईन बँक फ्रॉडच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. सध्याच्या ऑनलाईन, डिजीटल काळात अनेक फ्रॉडस्टर्स युजर्सच्या बँक खात्यातून पैसे लुटण्यासाठी अनेक प्रकारच्या पद्धतींचा वापर करत असल्याचं समोर आलं आहे. अनेकदा ऑफर्स, काही मोफत किंवा स्वस्त दरात देण्याच्या बहाण्याने, ऑटीपी मागून, मेसेज-लिंक्सद्वारे बँक फ्रॉड झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. वाढत्या फ्रॉडमध्ये सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. यामुळे मोठं नुकसान टाळता येऊ शकतं.

WhatsApp द्वारे फ्रॉड -

WhatsApp वर कोणताही Unknown व्हॉईस कॉल आल्यास सावध व्हा. फोन करणाऱ्याने फसवणुकीच्या हेतूने कॉल केलेला असू शकतो. व्हॉईस कॉल करणारा कोणत्याही ओटीपी किंवा इतर गोष्टींची विचारणा करुन फसवणूक करू शकतो.

(वाचा - Alert! शरीरातील Oxygen लेवल तपासण्यासाठी अ‍ॅप वापरताय, तर आधी हे वाचा)

UPI -

यूनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात यूपीआयद्वारे फ्रॉड करणारा डेबिट लिंक पाठवतो आणि त्या लिंकवर युजरने क्लिक केल्यानंतर फ्रॉडस्टर्सकडून पिन टाकला जातो आणि युजरच्या खात्यातून पैसे कट होतात. त्यापासून वाचण्यासाठी कोणत्याही अनोळखी व्यक्तीने पाठवलेली डेबिट रिक्वेस त्वरित डिलीट करा.

QR Code -

QR Code द्वारे फ्रॉड करणाऱ्यांकडून क्यूआर कोड लिंक पाठवली जाते आणि क्यूआर कोड लिंकवर क्लिक केल्यानंतर फ्रॉड करणारा, मोबाईल फोनचा क्यूआर कोड स्कॅन करुन बँक खात्यातून रक्कम काढली जाते. त्यामुळे कोणत्याही अनोळखी व्यक्तीने पाठवलेल्या क्यूआर कोडवर क्लिक करू नका.

(वाचा - Payment करताना अशाप्रकारे QR Code स्कॅन केल्यास बसू शकतो मोठा फटका; पाहा VIDEO)

लिंक -

कोरोना व्हायरसशी संबंधित कोणत्याही लिंकवर क्लिक करताना अतिशय विचारपूर्वक करा. सध्याच्या काळात फ्रॉडस्टर्स या कठीण परिस्थितीचा फायदा घेत फ्रॉड लिंक पाठवून लोकांची फसवणूक करत असल्याचं समोर आलं आहे.

या गोष्टी लक्षात ठेवाच -

- सोशल मीडियावर कोणत्याही Email, SMS किंवा मेसेजमध्ये दिलेल्या अटॅचमेंट ओपन करण्याचा प्रयत्न करू नका.

- WhatsApp वर फॉर्वर्ड केलेल्या कोणत्याही ऑफर्ससंदर्भातील लिंक ओपन करू नका. इतरांनाही फॉर्वर्ड करू नका.

- कोणत्याही बँकेतून बोलत असल्याचं सांगत फोन आल्यास आणि खासगी माहितीची विचारणा केल्यास ओटीपी, बँक डिटेल्स, आधार नंबर, पॅन नंबर शेअर करू नका.

First published:

Tags: Cyber crime, Money fraud, Tech news