जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Social Media: कोरोनाच्या कठीण काळात आशा आणि निराशेचा प्लॅटफॉर्म

Social Media: कोरोनाच्या कठीण काळात आशा आणि निराशेचा प्लॅटफॉर्म

Social Media: कोरोनाच्या कठीण काळात आशा आणि निराशेचा प्लॅटफॉर्म

मानवी इतिहासात कोविड-19 महामारी हा असा पहिला काळ असेल, की ज्यात लोकांना स्वतःच्या हाल अपेष्टा आणि धैर्य या साऱ्या गोष्टी मांडण्यासाठी त्यांच्याकडे सोशल मीडियासारखी ताकद आहे.

  • -MIN READ trending-desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 29 एप्रिल: ‘प्रत्येकाच्याआयुष्याला हल्ली बॅकग्राउंड म्युझिक असतं, तुझ्या लक्षात आलंय का? ‘इन्स्टाग्रामवरचा ट्रेंड पाहून माझी मैत्रीण मला विचारत होती. ‘हजारो लोक मरतायत आणि या लोकांना पोझ देण्यासाठी ऑरोराचा रनवे लागतो. इतके असंवेदनशीलते कसे होतात?’ ती रागाने बोलत होती. पश्चिम बंगालमधली ही माझी मैत्रीण कोविड-19 (Covid-19) मधून नुकतीच बरी होतेय. वयोवृद्ध आई-वडिलांसह होम आयसोलेशनमध्ये (Home Isolation) आहे. गेल्या काही दिवसांत तिने सोशल मीडियावरची उपस्थिती कमी केलीय. ‘ती अनियंत्रित सवयच झाली होती. मी इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर दिवसातून किमान 10 वेळा तरी क्लिक करायचे आणि मला त्याची जाणीव ही नाही व्हायची. आता मात्र मी काय पाहत होते याबद्दल मी अधिक सजग, सावध झालेआहे. आता हे सगळं घरापर्यंत येऊन पोहोचलं आहे. जेव्हा कोणी तरी ऑक्सिजन, औषधं किंवा हॉस्पिटलसाठी तळमळीने प्रयत्न करताना दिसतं, त्या वेळी असं वाटतं, की कोणत्याही क्षणी मी देखील यात असू शकेन. मला सहानुभूती व्यक्त करायची असते; मात्र भीतीची लाट मला वाहून नेते. काही वेळा मी मोठ्याने श्वास घेते. का? तर मलाच माझ्या श्वासाचा आवाज ऐकू यावा आणि मी जिवंत आहे, हे सिद्ध व्हावं म्हणून…’ असं ती सांगत होती. मानवी इतिहासात कोविड-19 महामारी (Covid19 Pandemic) हा असा पहिला काळ असेल, की ज्यात लोकांना स्वतःच्या हाल अपेष्टा आणि धैर्य या साऱ्या गोष्टी मांडण्यासाठी त्यांच्याकडे सोशल मीडियासारखी ताकद आहे. पूर्वीच्या काळी अशा ऐतिहासिक अनुभवांचं दस्तावेजी करण केवळ लेखक किंवा सामाजिक कार्यकर्तेच करू शकत होते. धक्कादायक! Covid-19 काळात Google वर सर्च केले गेले स्त्रियांचा छळ करण्याचे मार्ग दिल्लीतल्या 30 वर्षांच्या मृगांका सेन म्हणाल्या, ‘सध्या आरोग्यक्षेत्रावर जो प्रचंड ताण आला आहे, ते पाहता केवळ सोशल मीडिया हीच अशी जागा आहे, की जिथे आपला आवाज ऐकला जाऊ शकेल, मोठा केला जाऊ शकेल. त्यामुळे उपलब्ध बेड्ससाठी, प्लाझ्मा डोनेशनच्या माहितीसाठी लोक इन्स्टाग्राम किंवा ट्विटरवर गेले तरी नवल नाही.’ ‘माझ्या अनेक मित्र-मैत्रिणींनाअज्ञात व्यक्तींनी गरजेच्या वेळी मदत केली. त्यामुळे माणुसकी जिवंत असल्याचं यातून दिसतं; पण अशाच सोशल मीडियावरच्या लिस्टमधल्या नंबर्सवर कॉल करण्यात मी काही तास घालवलेही आहेत. त्यापैकी काही नंबर अस्तित्वात नसल्याचं कळलं, तर काही नंबर्सवरून मला योग्य ठिकाणी पोहोचता आला नाही, असाही अनुभव आहे,’ असंही त्यांनी सांगितलं. तो ट्रेंड बनतो हे धोकादायक  ‘सहानुभूती दाखवण्याचा सोशल मीडियावर ट्रेंड (Social Media Trend) बनतो हे धोकादायक आहे. अनेक लोक सोशल मीडियावर उपयुक्त माहिती शेअर करत असतात. त्यांचा हेतूही चांगलाअसतो; पण मदतीसाठी हे करताना ते जबाबदारीनेही केलं पाहिजे,’ अशी अपेक्षा त्या व्यक्त करतात. ‘जेव्हा अत्यंत आणीबाणीच्या वेळी कोणी अशा चुकीचे नंबर असलेल्या नंबरवर फोन लावतो, त्यावेळी त्याचा त्रागा होणारच. त्यामुळे असे नंबर्स शेअर करताना संबंधितांनी आधी त्यावर कॉल करून पाहून, पडताळणी करून मगच शेअर केले पाहिजेत,’ असं सेन म्हणतात. गेल्या वर्षभरात आपल्या समाजाचं चित्र सोशल मीडियावर दिसलं. सामाजिक जबाबदारी, सहवेदना आदी गोष्टींचा अभाव दिसून आला. संसर्ग होतोच मग मी कोरोना लस का घ्यावी? संशोधकांनी सांगितला मोठा फायदा सोशल मीडियाने बरच चांगलं केलं पण… गुजरातमधले सोशियॉलॉजिस्ट गौरांग जानी यांनी न्यूज 18 ला सांगितलं, ‘कोविड 19 हा एवढ्या मोठ्या प्रमाणावरच्या सामाजिक आणीबाणीचा आपला पहिला अनुभव आहे. अनेक वैयक्तिक अनुभवांमध्ये सारखेपणा आढळला. अनेकांनी हा भयावह अनुभव घेतलेला असल्यामुळे विषाणूच्या संदर्भात आपण अधिकारवाणीने बोलू शकतो असा समज अनेकांनी करून घेतला. त्यामुळे सोशल मीडियात खूप प्रमाणात चुकीची माहिती गोळा झाली. त्यामुळे सोशल मीडियातून बरंच काही चांगलं केलं गेलं असलं, तरी यामुळे आरोग्याविषयीची चुकीची माहितीही बऱ्याच प्रमाणात पसरली.’ ‘लॉकडाउन (Lockdown) थोडं शिथिल झाल्यावर अनेकांनी सहली काढल्या, मोठे लग्नसोहळे केले, कोविड प्रोटोकॉल्सचं उल्लंघन केलं. या सगळ्याचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले. त्यामुळे महामारी संपली असल्याचा संकेत दिला गेला. त्यामुळेच शैथिल्य आलं आणि गंभीर दुसरी लाट आली,’ असं त्यांनी सांगितलं. अनेकजण बेजबाबदारपणे वागतात स्नेहा शर्मा (नाव बदललं आहे) या मुंबईतल्या मीडिया प्रोफेशनलने, आपला चुलत भाऊ वाढदिवसाच्या मोठ्या पार्टीचं लाइव्ह करतो आहे, हे पाहून तिचं फेसबुक अकाउंट डिलीट केलं. ‘त्याला कोविड-19 झाला होता. तो गंभीर आजारी होता. हॉस्पिटलमधून परतल्यावर काही दिवसांनी तो पार्टी लाइव्ह स्ट्रीमिंग करत असल्याचं पाहिलं. असे अनेकजण बेजबाबदारपणे वागतात,’ असं ती म्हणाली. स्वतः स्नेहाही कोविडमधून बरी झाली आहे. तसंच, तिच्या कामामुळे ती घरीही जात नाही. कारण आपल्यामुळे घरच्यांना त्रास होईल, ही संकल्पना तिला पटत नाही. अशा स्थितीत बाकीचे सोशल मीडियावर अशा पद्धतीने वागत असतात, की कोविड-19 नाहीच आहे. त्यांचं हे वागणं दुःखद असल्याचं ती सांगते. Lockdown मध्ये घरात राहून पोट सुटलंय? डोंट वरी! फक्त ही 5 फळं कमी करतील तुमचं Belly fat सोशल मीडिया वापरण्यात मोठा बदल  मुंबईतल्या सायकॉलॉजिस्ट प्रियांका वर्मा यांनीही आपलं मत व्यक्त केलं. ‘दुसऱ्या लाटेत लोकांच्या मनात वेगवेगळ्या प्रकारच्या भावना आहेत. प्रोटोकॉल पाळत नसलेल्यां बद्दल राग आहेच. अलीकडे तो व्यक्तही होऊ लागला आहे. कोणी लग्नाचे फोटो शेअर केले, तर त्यावरही लोक टीका करत आहेत. गेल्या वर्षभरात आपल्या आयुष्यात आणि सोशल मीडिया वापरण्यात मोठा बदल झाला आहे. लॉकडाउनच्या सुरुवातीच्या काळात रेसिपीज, डान्स, कुकिंग व्हिडिओ वगैरे शेअर करून झालं. आता श्रद्धांजली, दुःख,निरोप आदींसाठी तो वापरला जातोय. आपल्या गुंतागुंतीच्या भावना व्यक्त करण्यासाठी ती एक शेअर्ड स्पेस आहे,’ असं त्या म्हणाल्या. ‘पूर्वी बाळाला जन्म देणं हा एक प्रकारचा सोहळा होता. किमान 10 नातेवाईक हॉस्पिटलच्या रूम बाहेर बाळाच्या आगमनाच्या बातमीची वाट पाहत बसलेले असायचे. आता मात्र गर्भवती महिला एकट्याच असतात. आयुष्यातला इतका महत्त्वाचा आनंद व्यक्त करण्यासाठी बरोबर कोणीही असत नाही. मग हे व्यक्त करण्यासाठी काही महिला सोशल मीडियाचा आधार घेतात. मग तिची ही शेअरिंगची भावनिक गरज ओळखली पाहिजे,’ असंही वर्मा म्हणतात. ‘काही लोक सातत्याने पोस्ट्सचा भडिमार करत असतात, त्याचा त्रास होतो,’ असं मुंबईतल्या 33 वर्षांच्या पौलमी मुखोपाध्याय म्हणतात. त्याचं व्यसन लागू शकत सोशल मीडिया हे माणसांना त्यांच्या आवडत्या व्यक्तींशी संपर्कात राहण्याची सुविधा देणारं साधन आहे; पण त्याचं व्यसन लागू शकतं, असं हिरानंदानी हॉस्पिटलचे सायकियाट्रिस्ट डॉ. हरीश शेट्टी सांगतात. सोशल मीडिया वाईट नाही आणि संकटही नाही. लॉकडाउनदरम्यान त्याचा चांगला उपयोग खूप जणांनी केल्याचं ते सांगतात. लॉकडाउन दरम्यान लोकांच्या भावनांना वाट देण्यासाठी सोशल मीडिया हे उत्तम साधन ठरल्याचं नताशा मेहता या मुंबईतल्या ज्येष्ठ कौन्सेलिंग सायकॉलॉजिस्टनी सांगितलं. त्यामुळे आनंद नक्कीच मिळाला,मिळतो; पण एका दुष्टचक्रात अडकण्याचीही शक्यता असते, असं त्यांनी सांगितलं. ज्यांना सोशल मीडियावरच्या दुःखद पोस्ट्सचा त्रास होतोय असं वाटतं, त्यांनी सोशल मीडिया टाळावा; मात्र अनेकांना त्यांचं दुःख व्यक्त करण्यासाठी आजूबाजूला कोणी नसल्यामुळे सोशल मीडियावर व्यक्त व्हावंसं वाटतं. तर, त्यांना ते होऊ दिलं पाहिजे, असं मेहता यांनी सांगितलं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात