मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

क्या बात है! 15 वर्षाच्या मुलानं बनवलं WhatsApp च्या तोडीचं भारतीय अ‍ॅप

क्या बात है! 15 वर्षाच्या मुलानं बनवलं WhatsApp च्या तोडीचं भारतीय अ‍ॅप

रोजच्या जीवनातील अविभाज्य भाग बनलेल्या Whatsapp ची नवी प्रायव्हसी पॉलिसी आल्यानंतर त्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

रोजच्या जीवनातील अविभाज्य भाग बनलेल्या Whatsapp ची नवी प्रायव्हसी पॉलिसी आल्यानंतर त्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

रोजच्या जीवनातील अविभाज्य भाग बनलेल्या Whatsapp ची नवी प्रायव्हसी पॉलिसी आल्यानंतर त्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

  • Published by:  News18 Desk

चंदीगड, 24 फेब्रुवारी : रोजच्या जीवनातील अविभाज्य भाग बनलेल्या WhatsApp ची नवी प्रायव्हसी पॉलिसी आल्यानंतर त्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.  त्याला पर्याय म्हणून अन्य अ‍ॅपचा शोध घेतला जात असून त्याच्या युझर्समध्ये (Users) देखील वाढ झाली आहे. अनेक तंत्रज्ञ आणि मोठ्या कंपन्यांच्या पाठबळानं तयार होणारं अशा प्रकारचं एक नवं  अ‍ॅप हरियाणातील एका 15 वर्षाच्या मुलानं बनवलं आहे.

हरियाणा (Haryana) मधील रेवाडी जिल्ह्यातल्या 9 वी मध्ये शिकणाऱ्या हार्दिक कुमार दिवाण या विद्यार्थ्याने बीटल हे एक चॅटिंग मोबाईल अ‍ॅप्लिकेशन बनवलं आहे. हे अ‍ॅप्लिकेशन प्ले स्टोरमध्ये (Play Store) उपलब्ध असून यामध्ये व्हॉट्सअपच्या तोडीचे सर्व फिचर्स आहेत.

‘बीटल अ‍ॅपचा व्हॉट्सअपप्रमाणे व्यावसायिक कामासाठी उपयोग करता येऊ शकतो’, असा दावा हार्दिकनं केला आहे. यामधील चॅटिंग आणि व्हिडीओ रेकॉर्ड केले जाऊ शकत नाहीत. डेटा सुरक्षेच्या सर्व गोष्टींची खबरदारी यामध्ये घेण्यात आली आहे.

कशी झाली निर्मिती?

हार्दिकनं लॉकडाऊनमध्ये कुकिंग संबंधीचे व्हिडीओ (Video) यूट्यूब (YouTube) वर बनवण्यास सुरुवात केली आहे. काही व्हिडीओ बनवल्यानंतर त्याला कॉम्पुटरमध्ये आवड निर्माण झाली. त्यानं ऑनलाईन कोडिंग क्लासेस घेण्यास सुरुवात केली. त्यामधूनच बीटल या चॅटिंग अ‍ॅपचा जन्म झाला.

( वाचा : नव्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये काय होणार बदल; WhatsApp ने दिली माहिती )

हार्दिकनं जवळपास तीन महिने या अ‍ॅपच्या कोडिंगवर काम केले आहे. त्यानंतर ते गुगल प्ले स्टोर (Google Play Store) वर नोंदवण्यात आले. यामध्ये हळूहळू अपडेट केले जात असून लवकरच ते आयओएस (IOS) प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहे.

गृहमंत्र्यांनी मागवला रिपोर्ट

हार्दिकला भविष्यात सायबर क्राईम एक्सपर्ट वकील व्हायचं आहे. सध्या त्यानं हरयाणाचे गृहमंत्री अनिल विज यांची मदत मागितली आहे. त्यानंतर अनिल विज यांनी याबाबतचा अहवाल मागितला आहे. त्यानंतर माहिती आणि तंत्रज्ञान विभागाला हा अहवाल पाठवून मदत करण्याची शिफारस केली जाणार आहे.

First published:

Tags: Haryana, Privacy, Tech news, Technology, Whatsapp, WhatsApp chats, WhatsApp user