मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /आज लाँच होणाऱ्या JioPhone Next ची तारिख पुढे ढकलली, कंपनीने सांगितलं हे कारण

आज लाँच होणाऱ्या JioPhone Next ची तारिख पुढे ढकलली, कंपनीने सांगितलं हे कारण

आज 10 सप्टेंबर गणेश चतुर्थीच्या दिवशी जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन JioPhone Next लाँच होणार होता. परंतु आता या फोनचं लाँचिंग पुढे ढकलण्यात आलं आहे.

आज 10 सप्टेंबर गणेश चतुर्थीच्या दिवशी जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन JioPhone Next लाँच होणार होता. परंतु आता या फोनचं लाँचिंग पुढे ढकलण्यात आलं आहे.

आज 10 सप्टेंबर गणेश चतुर्थीच्या दिवशी जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन JioPhone Next लाँच होणार होता. परंतु आता या फोनचं लाँचिंग पुढे ढकलण्यात आलं आहे.

नवी दिल्ली, 10 सप्टेंबर : आज 10 सप्टेंबर गणेश चतुर्थीच्या दिवशी जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन JioPhone Next लाँच होणार होता. परंतु आता या फोनचं लाँचिंग पुढे ढकलण्यात आलं आहे. आता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात, दिवाळीच्या जवळपास फोन लाँच करण्यात येईल, अशी माहिती आहे. जगभरात चिप शॉर्टेजमुळे फोन लाँच होण्यास वेळ लागत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

गुरुवारी रात्री उशिरा रिलायन्स जिओने याबाबत माहिती दिली. गुगल आणि जिओने मिळून तयार केलेला हा फोन दोन्ही कंपन्यांनी आपल्या काही मर्यादित युजर्ससह जिओफोन नेक्स्टचं टेस्टिंग सुरू केलं आहे. दिवाळीच्या सीजनमध्ये मोठ्या रुपात अधिक व्यापकपणे फोन उपलब्ध होण्यासाठी यावर सक्रियपणे काम करत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

लाखो फोन्सवर बंद होणार Gmail, Maps आणि YouTube सारखे Google Apps, हे आहे कारण

मेड फॉर इंडिया स्मार्टफोन दोन्ही कंपन्यांनी मिळून तयार केला आहे, जो भारतातील 300 मिलियन फीचर फोन युजर्सला लक्षात घेऊन बनवण्यात आला आहे. यावर्षी 24 जून रोजी रिलायन्स इंडस्ट्रिजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी JioPhone Next ची घोषणा केली होती.

Ola ने इलेक्ट्रिक स्कूटर S1 ची विक्री थांबवली; कंपनीने दिलं असं कारण

भारतात JioPhone Next च्या किमतीचा तसंच फीचर्सचा अधिकृतरित्या खुलासा करण्यात आलेला नाही. परंतु मिळालेल्या लीकनुसार, Jio स्मार्टफोन 3499 रुपयांपर्यंत असू शकतो. तसंच JioPhone नेक्स्टमध्ये 5.5-इंची HD डिस्प्ले, क्वालकॉम QM215 SoC असण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन दोन रॅम आणि स्टोरेज वेरिएंटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. ज्यात 2GB RAM + 16GB स्टोरेज आणि 3GB RAM + 32GB स्टोरेज सामिल असेल. 2GB RAM ची किंमत जवळपास 3499 असू शकते. तर टॉप एंड मॉडेलची किंमत जवळपास 5,000 रुपयांपर्यंत असू शकते.

First published:
top videos

    Tags: Reliance Jio, Smartphone