नवी दिल्ली, 9 सप्टेंबर : जगभरातील अनेक अँड्रॉईड स्मार्टफोन्सवर (Android Smartphone) गुगलचे पॉप्युलर अॅप्स बंद होणार आहेत. कंपनी या महिन्याच्या अखेरपर्यंत लाखो स्मार्टफोन्समधून Google Maps, YouTube आणि Gmail सारख्या अॅप्सचं सपोर्ट बंद करणार आहे. गुगलने याबाबतची माहिती आपल्या वेबसाईटवर दिली आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, अँड्रॉईड 2.3 वर्जन (Android 2.3) वापरणारे युजर्स 27 सप्टेंबरपासून आपल्या डिव्हाईसवर गुगल अकाउंट लॉगइन करू शकणार नाहीत. गुगलचं Android 2.3 ऑपरेटिंग सिस्टम डिसेंबर 2010 मध्ये लाँच करण्यात आलं होतं. आता ते अधिकच जुनं झाल्याने या 2.3 वर्जनवर Google Apps सुरू होणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे.
Google ने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी आपल्या ग्राहकांची सुरक्षा पाहता जुन्या प्लॅटफॉर्म्सवरील सपोर्ट परत घेत आहे. कंपनी अनेकदा अँड्रॉईड सॉफ्टवेअरच्या जुन्या वर्जनमधून सपोर्ट परत घेत असते. ऑपरेटिंग सिस्टमचे जुने वर्जन बग्स आणि हॅकर्सच्या विळख्यात सहज येऊ शकतात. त्यामुळेच कंपनीकडून ही पावलं उचचली जातात. सध्या Android 11 सर्वात लेटेस्ट वर्जन आहे. लवकरच Android 12 ऑपरेटिंग सिस्टम येण्याच्या मार्गावर आहे.
गुगलच्या या निर्णयानंतर Android 2.3 वर्जनवर चालणाऱ्या डिव्हाईसवर गुगल अकाउंट सुरू राहणार नाही. युजर्सने योग्य डिटेल्स भरले, तरी युजरनेम आणि पासवर्ड Error दिसेल. डिव्हाईसच्या सेटिंग मेन्यूमध्ये Google कॅलेंडर किंवा जीमेल अकाउंटही एरर दाखवेल. YouTube, Google Play Store, Google maps, Gmail, Google कॅलेंडर हे अॅप जुन्या वर्जनमध्ये काम करणार नाहीत.
Google चे हे पॉप्युलर अॅप्स सुरू ठेवण्यासाठी स्मार्टफोन Android 3.0 मध्ये अपग्रेड करावा लागेल. त्यासाठी डिव्हाईस सेटिंगमध्ये System मध्ये Advanced वर टॅप करुन System Update वर जावं लागेल. Android 2.3 चे सर्वच डिव्हाईस पुढील वर्जनमध्ये शिफ्ट होऊ शकणार नाहीत. त्यामुळे नव्या डिव्हाईसवर ते अपग्रेड करणं फायद्याचं ठरेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.