Home /News /technology /

Jio चा जबरदस्त प्लॅन, 75GB इंटरनेटसह मिळेल Netflix-Amazon Prime चं फ्री सब्सक्रिप्शन

Jio चा जबरदस्त प्लॅन, 75GB इंटरनेटसह मिळेल Netflix-Amazon Prime चं फ्री सब्सक्रिप्शन

Jio पोस्टपेड प्लॅनमध्ये कमी किमतीत अधिक बेनिफिट्स मिळतील. यात 75GB डेटासह नेटफ्लिक्स आणि अ‍ॅमेझॉन प्राइमचं सब्सक्रिप्शन मिळतं आहे.

  नवी दिल्ली, 19 सप्टेंबर : Jio आपल्या ग्राहकांसाठी नेहमी नव्या ऑफर्स घेऊन येत असतं. स्वस्तात अधिक बेनिफिट्ससाठी जिओची ओळख आहे. Jio चे प्रीपेडशिवाय (Jio Prepaid and Postpaid Plans) पोस्टपेडचेही जबरदस्त प्लॅन्स आहेत. पोस्टपेड प्लॅनमध्ये कमी किमतीत अधिक बेनिफिट्स मिळतील. यात 75GB डेटासह नेटफ्लिक्स आणि अ‍ॅमेझॉन प्राइमचं सब्सक्रिप्शन मिळतं आहे. Jio 399 पोस्टपेड प्लॅन - जिओच्या 399 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये एक महिन्यापर्यंत 75GB डेटा दिला जातो. यात दिवसाला मिळणाऱ्या डेटासाठी कोणताही हिशोब नाही. संपूर्ण महिन्यात कोणत्याही दिवशी कितीही डेटाचा वापर करू शकता. जर डेटा राहिला, तर जिओ या प्लॅनमध्ये 200GB पर्यंतचा डेटा रोलओवरची सुविधा देतं. जर डेटा संपला, तर कंपनी 1GB डेटासाठी 10 रुपये चार्ज करेल. अनलिमिटेड कॉलिंगसह Netflix-Amazon Prime सब्सक्रिप्शन फ्री - या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह रोज 100 SMS दिले जातात. जर OTT कंटेंट पाहत असाल, तर हा प्लॅन तुमच्यासाठी चांगला ठरू शकतो. या प्लॅनमध्ये Netflix, Amazon Prime आणि Disney+ Hotstar फ्री सब्सक्रिप्शन मिळतं. त्याशिवाय Jio Apps चं फ्री सब्सक्रिप्शन दिलं जाईल.

  खुशखबर : Jio ने लॉन्च केला सर्वात स्वस्त प्लॅन; 3GB डाटासह फ्री अनलिमिटेड कॉलिंग

  Jio 399 प्रीपेड प्लॅन - जिओच्या 399 प्रीपेड प्लॅनची वॅलिडिटी 56 दिवसांची आहे, ज्यात दररोज 1.5GB डेटा दिला जातो. प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 SMS ची सुविधा आहे. त्याशिवाय Jio Apps चं सब्सक्रिप्शनही दिलं जातं. JioPhone वापरकर्त्यांना 75 रुपयांच्या या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता मिळते. या व्यतिरिक्त, दररोज 50 एसएमएस आणि Jio TV, Jio Cinema, Jio News, JioSecurity आणि JioCloud सारख्या अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस देखील या प्लॅनमध्ये देण्यात आला आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Recharge, Reliance Jio, Reliance jio postpaid

  पुढील बातम्या