Home /News /technology /

Jio Phone Next ग्राहकांसाठी Bad News! आणखी काही दिवस करावी लागणार प्रतीक्षा

Jio Phone Next ग्राहकांसाठी Bad News! आणखी काही दिवस करावी लागणार प्रतीक्षा

रिलायन्स जिओ (Reliance Jio) या देशातल्या प्रसिद्ध टेलिकॉम कंपनीच्या जिओफोन नेक्स्ट (Jio Phone Next) या नव्या स्मार्टफोनची (Smartphone) प्रतीक्षा लवकरच संपणार असं वाटत असताना, या फोनचं लॉंचिंग दिवाळीपर्यंत (Diwali) लांबणीवर पडलं आहे.

पुढे वाचा ...
 मुंबई, 16 सप्टेंबर-   रिलायन्स जिओ (Reliance Jio) या देशातल्या प्रसिद्ध टेलिकॉम कंपनीच्या जिओफोन नेक्स्ट (Jio Phone Next) या नव्या स्मार्टफोनची (Smartphone) प्रतीक्षा लवकरच संपणार असं वाटत असताना, या फोनचं लॉंचिंग दिवाळीपर्यंत (Diwali) लांबणीवर पडलं आहे. यामुळे जिओच्या ग्राहकांचा काहीसा हिरमोड झाला आहे. हा स्मार्टफोन ग्राहकांना 5000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध होईल, असं कंपनीनं जाहीर केलं होतं. परंतु, लॉंचिंग उशिरा होणार असल्यानं या फोनची किंमत अधिक असेल, असं सांगितलं जात आहे. अर्थात यामागे काही तांत्रिक कारणं असल्याचं बोललं जात आहे. या वर्षाच्या सुरुवातीला 44 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जिओ कंपनीनं गुगल बेस्ड (Google Based) जिओफोन नेक्स्टची घोषणा केली होती. हा स्मार्टफोन 10 सप्टेंबरला लॉंच होणार होता; मात्र वाइड सेमीकंडक्टरचा (Semiconductor) तुटवडा असल्याचं कारण देत या फोनचं लॉंचिंग दिवाळीपर्यंत लांबणीवर टाकण्यात आल्याचं लॉंचिंगच्या एक दिवस आधी जाहीर करण्यात आलं. लॉंचिंगला उशीर होणार असल्याने जिओ फोन नेक्स्टची किंमत कदाचित आधी जाहीर झालेल्या किमतीपेक्षा अधिक असू शकते, असा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला आहे; मात्र डिव्हाइसच्या किमतीबाबत अद्याप कोणतीही माहीती जाहिर करण्यात आलेली नाही. (हे वाचा:जबरदस्त फीचर्ससह Apple चा iPad आणि iPad Mini लाँच, पाहा काय आहे किंमत ) जिओ फोन नेक्स्ट हा जिओ फोन आणि जिओ फोन 2 चं पुढील व्हर्जन (Version) नसेल. अँड्रॉइड कस्टम व्हर्जनसह जिओ फोन नेक्स्टमध्ये गुगल असिस्टंट, ऑटोमॅटिक रीड अलाउड आणि भाषांतर या फीचर्सचा समावेश असेल. तसंच यात ऑन स्क्रिन टेक्स्ट आणि कॅमेरा विथ इंडिया सेंट्रिक फिल्टर्सचा समावेशही असेल. जिओ फोन नेक्स्टला 5.5 इंचांचा HD डिस्प्ले असेल, असं सांगण्यात आलं आहे. तो स्नॅपड्रॅगन 215 चिपसेटवर काम करील. यात 2 आणि 3 GB रॅम, तसंच 16 आणि 32 GB ऑनबोर्ड स्टोरेज असेल. डिव्हाइसमध्ये सिंगल 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा सेन्सर आणि 8 मेगापिक्सेल शूटर सपोर्ट असेल. तसंच याची बॅटरी 2500mAh क्षमतेची असेल. या फोनची सुरुवातीची किंमत कमी असावी, यासाठी जिओनं अनेक बॅंकांसोबत भागीदारी केली होती. यामुळे युझर्सना हा फोन 500 रुपयांत हा फोन खरेदी करता येणार असून, आणि उर्वरित रक्कम युझर्स हप्त्याने भरू शकणार होते. जिओ नेक्स्ट फोनची प्रक्रिया प्रगतिपथावर असल्याचं गुगल आणि जिओनं सांगितलं. कंपनीने जिओ नेक्स्टच्या चाचण्या (Testing) सुरू केल्या असून, ही सुविधा सध्या मर्यादित युझर्ससाठी असेल; मात्र, जिओ नेक्स्ट फोनचं लॉंचिंग लांबणीवर पडल्यानं तो महाग असण्याची शक्यता एका वृत्तात व्यक्त करण्यात आली आहे. (हे वाचा:किडनीसोबत काय काय विकावं लागणार? लोकांचा प्रश्न; iPhone13 लाँचनंतर मीम्सचा पाऊस) याबाबत विश्लेषकांनी ईटी टेलिकॉमला सांगितलं, की कॉम्पोनंट्सच्या किमतीत 20 टक्के वाढ झाली असून, कॉम्पोनंट्सच्या (Components) खरेदीचा कालावधी 8 आठवड्यांवरून सुमारे 16 ते 20 आठवड्यांपर्यंत गेला आहे. जोपर्यंत टेल्को पुढील वर्षासाठी नवीन एसकेयूवर लक्ष केंद्रित करत नाही, तोपर्यंत जिओ नेक्स्टचं शेल्फ लाइफ मर्यादित असू शकते. कारण कॉम्पोनंट्सची उपलब्धता आणि किंमत ही बाब पुढील 6 ते 8 महिन्यांपर्यंत आव्हानात्मक ठरू शकते. एकूणच ही सर्व स्थिती पाहता, लॉंचिंगला उशीर झाल्याने जिओ नेक्स्ट फोनची खरेदी युझर्सना कदाचित ज्यादा किंमत मोजून करावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
First published:

Tags: Smartphone, Techonology

पुढील बातम्या