मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन JioPhone Next कधी लाँच होणार? Google CEO सुंदर पिचाई यांनी दिली माहिती

जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन JioPhone Next कधी लाँच होणार? Google CEO सुंदर पिचाई यांनी दिली माहिती

JioPhone Next च्या लॉन्चिंग आधीच या फोनची मोठी चर्चा आहे. आता याविषयी गुगलचे CEO सुंदर पिचाई (Google CEO Sundar Pichai) यांनी मोठा खुलासा केला आहे.

  • Published by:  Atik Shaikh

नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : JioPhone Next च्या लॉन्चिंग आधीच या फोनची मोठी चर्चा आहे. आता याविषयी गुगलचे CEO सुंदर पिचाई (Google CEO Sundar Pichai) यांनी मोठा खुलासा केला आहे. आम्ही रिलायंस कंपनीसोबत मेड फॉर इंडिया अफोर्डेबल स्मार्टफोन तयार करत असून यात इतर कोणत्याही स्मार्टफोनसारखे फीचर्स मिळतील. या फोनला आम्ही दिवाळीच्या (Jio Phone Next to launch on Diwali) मुहूर्तावर किंवा दिवाळीच्या एक-दोन दिवस आधी लॉन्च करणार असल्याची माहिती CEO सुंदर पिचाई यांनी दिली आहे.

एका कार्यक्रमात पिचाई यांनी याबाबत हा खुलासा केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं, की भारतात कोरोनामुळे मोबाइल मार्केटवर मोठा परिणाम झाला होता. परंतु आता स्मार्टफोन (Jio Phone Next) वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा वेळी स्मार्टफोन वापरणाऱ्या ग्राहकांना जियोफोन नेक्स्ट मोबाइल (jio phone next launch date in india) फायदेशीर ठरणार आहे. यावेळी त्यांनी या स्मार्टफोनच्या लॉन्चिंगबाबतही खुलासा केला आहे.

6G in India: 5G सोबतच सरकार करतंय 6G नेटवर्कचीही तयारी; पाहा किती असेल स्पीड

दरम्यान, Jio ने काही दिवसांपूर्वी JioPhone Next च्या मेकिंगचा Video जारी केला होता. हा स्मार्टफोन प्रगति ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. प्रगती ऑपरेटिंग सिस्टमला गूगल आणि जिओने मिळून तयार केलेलं आहे. यामुळे कमीत कमी किंमतीत ग्राहकांना चांगला एक्सपिरीयंस मिळणार आहे.

जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन JioPhone Next फक्त 1999 रुपयांत; Reliance कडून दिवाळी गिफ्ट

किती असू शकते किंमत?

जिओच्या या स्मार्टफोनची किंमत 3499 रूपये असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. JioPhone Next जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन ठरणार आहे. त्यामुळे ग्राहकांना अतिशय कमी किंमतीत चांगल्या लेटेस्ट फीचर्सचा लाभ घेता येणार आहे.

First published:

Tags: CEO, Google, Reliance Jio, Reliance Jio Internet