Home /News /technology /

जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन JioPhone Next फक्त 1999 रुपयांत; Reliance कडून दिवाळी गिफ्ट

जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन JioPhone Next फक्त 1999 रुपयांत; Reliance कडून दिवाळी गिफ्ट

पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या या स्मार्टफोनची बुकिंग अमाउंट अवघी 1,999 असणार आहे. नोंदणी केल्यानंतर उरलेली रक्कम तुम्ही 18 ते 24 महिन्यांच्या हप्त्यांमध्ये भरू शकता.

नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : Reliance Jio ने काही दिवसांपूर्वी घोषणा केलेला JioPhone Next दिवाळीपासून ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. जिओ आणि गुगलने संयुक्तपणे या फोनचं डिझाइन केलं (Smartphone by Jio and Google) आहे. पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या या स्मार्टफोनची बुकिंग अमाउंट अवघी 1,999 असणार आहे. यामुळे हा जगातला सर्वांत स्वस्त स्मार्टफोन (Most Affordable Entry price) म्हणूनही ओळखला जातो आहे. नोंदणी केल्यानंतर उरलेली रक्कम तुम्ही 18 ते 24 महिन्यांच्या हप्त्यांमध्ये भरू शकता. विशेष म्हणजे एन्ट्री-लेव्हल स्मार्टफोन (Jio Smartphone) असूनही यात बरेचशे लेटेस्ट फीचर्स आहेत. तसंच, देशातल्या सर्व नागरिकांना डोळ्यांसमोर ठेवून या स्मार्टफोनचं डिझाइन करण्यात आलं आहे. यातलं सर्वांत महत्त्वाचं फीचर (JioPhone next features) म्हणजे, ट्रान्सलेट. आपल्या देशात विविध भाषिक नागरिक असल्याचं लक्षात घेऊनच या फोनमधला कन्टेन्ट दहा भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासोबतच, यात असणाऱ्या एका खास फीचरमुळे तुम्ही स्क्रीनवर दिसणारा कन्टेन्ट केवळ एका टॅपमध्ये तुमच्या भाषेमध्ये ट्रान्सलेट (Jiophone next translate feature) करू शकता. यासोबतच, आणखी एका फीचरच्या मदतीने स्क्रीनवरील कन्टेन्ट तुम्हाला तुमच्या भाषेत वाचून दाखवला जाईल. याचप्रकारे तुम्ही आपल्या भाषेमध्ये या स्मार्टफोनला सूचनाही देऊ शकता. म्हणजेच, वाचता न येणारी व्यक्तीही हा स्मार्टफोन वापरू शकेल. Google ने खास या फोनसाठी अँड्रॉइडचं एक ऑप्टिमाइज्ड व्हर्जन तयार केलं आहे. ‘प्रगती’ असं या ऑपरेटिंग सिस्टिमचं (Pragati OS by android) नाव आहे. यासोबतच, फोनचा प्रोसेसरही क्वालकॉम या कंपनीचा असणार आहे. मोबाइल प्रोसेसर बनवणाऱ्या अग्रगण्य कंपन्यांमध्ये क्वालकॉमचा (Jiophone with qualcomm) समावेश होतो. हा प्रोसेसर फोनची कनेक्टिव्हिटी, लोकेशन टेक्नॉलॉजी, इन डिव्हाइस परफॉर्मन्स, ऑडिओ आणि बॅटरीला ऑप्टिमाइज करेल. यामुळे ते अधिक चांगल्या प्रकारे परफॉर्म करू शकणार आहेत. यासोबतच या स्मार्टफोनला उत्तम दर्जाचा कॅमेरा (Jiophone next camera features) असणार आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही अगदी रात्रीही स्पष्ट फोटो घेऊ शकाल. यासोबतच या कॅमेऱ्यात पोर्ट्रेट मोड, फिल्टर्स अशा सुविधाही असणार आहेत.

तुमचं Adhaar Card परवानगीशिवाय कुठे वापरलं जातंय का? एका मिनिटात असं तपासा

“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरात कच्च्या मालाचा तुटवडा जाणवत असतानाही, सणांच्या कालावधीत Jio आणि Google यांनी यशस्वीपणे भारतीयांना ही भेट दिली याबाबत मी आनंदी आहे. डिजिटल क्रांती ही 135 कोटी भारतीयांना अधिक सक्षम बनवू शकते, याबाबत मला पहिल्यापासून खात्री आहे. यातच आमचाही वाटा असावा म्हणून आम्ही आधी सर्वांना इंटरनेट आणि मोबाइल नेटवर्कच्या माध्यमातून एकत्र जोडलंच आहे. आता आम्ही त्यासाठी या स्मार्टफोनच्या मदतीने पुन्हा एकदा पाऊल उचललं आहे,” असं मत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani on Jiophone next launch) यांनी व्यक्त केले. “या फोनच्या मदतीने आम्ही इंडिया आणि भारत यांच्यामधलं अंतर कमी करत आहोत. कारण, आता प्रगती ओएसच्या मदतीने भारतही प्रगती करणार आहे,” असंही ते म्हणाले. “इंटरनेमुळे उपलब्ध झालेल्या संधी प्रत्येक भारतीयाला मिळाव्यात या भावनेतून हा स्मार्टफोन तयार करण्यात आला आहे. या स्मार्टफोनचा वापर करून लाखो भारतीयांचं आयुष्य कशा प्रकारे बदलतं, हे पाहण्यासाठी मी अगदी आतुर आहे,” अशा शब्दांमध्ये गुगलचे सुंदर पिचाई (Sundar Pichai on JioPhone launch) यांनी या स्मार्टफोनमागची संकल्पना स्पष्ट केली.

6G in India: 5G सोबतच सरकार करतंय 6G नेटवर्कचीही तयारी; पाहा किती असेल स्पीड

JioPhone Next फीचर्स - अँड्रॉइडची ऑपरेटिंग सिस्टीम असल्यामुळे या फोनवर तुम्ही प्लेस्टोअरवरची हजारो Apps डाउनलोड करू शकता. यात गुगलची काही Apps आणि जिओची Apps प्रीलोडेड असणार आहेत. या फोनमध्ये येणारे नवे अपडेट्स ऑटोमॅटिकली अपडेट होणार आहेत. तसंच, यात असणाऱ्या ‘निअरबाय शेअर’ (Nearby Share) फीचरचा वापर करून तुम्ही इंटरनेटशिवायही आपल्या मित्रांना Apps, फाइल्स, फोटो, व्हिडिओ, गाणी आणि इतर गोष्टी पाठवू शकणार आहात. अशा प्रकारे करा बुक - जिओफोन नेक्स्ट मिळवण्यासाठी तुम्हाला आधी रजिस्ट्रेशन (How to register for jiophone next) करावं लागणार आहे. यासाठी तुम्ही नजीकच्या जिओमार्ट डिजिटल दुकानात जाऊ शकता. www.jio.com/next या वेबसाइटवर जाऊन रजिस्ट्रेशन करणंही शक्य आहे. याशिवाय, 7018270182 या नंबरच्या WhatsApp वर “Hi” असा मेसेजही तुम्ही करू शकता. तुमची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन मिळेल. यानंतर जवळच्या जिओमार्ट रिटेलरकडे जाऊन तुम्ही तुमचा जिओफोन नेक्स्ट घेऊ शकाल. यासाठी तुम्हाला सुरुवातीला केवळ 1,999 रुपये भरायचे आहेत. उरलेले पैसे तुम्ही हप्त्यांमध्ये भरू शकता.
First published:

Tags: Reliance Industries, Reliance Jio

पुढील बातम्या