नवी दिल्ली, 13 जानेवारी : Whatsapp ची नवी प्रायव्हसी पॉलिसी आल्यानंतर त्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. व्हॉट्सअॅपने पॉप-अप नोटिफिकेशनद्वारे युजर्सला याबाबत माहिती दिली आहे. Whatsapp सुरू ठेवण्यासाठी या नव्या प्रायव्हसी पॉलिसीला अॅक्सेप्ट करावं लागणार आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅप युजर्समध्ये चिंतेचं तसंच संभ्रमाचं वातावरण आहे. नव्या पॉलिसीद्वारे Whatsapp Facebook शी किती डेटा शेअर करणार याबाबत युजर्समध्ये कोणतीही स्पष्टता नाही.
Whatsapp युजर्सचा हा गोंधळ पाहता व्हॉट्सअॅपने एक ब्लॉग लिहिला आहे. Whatsapp ने ब्लॉगमध्ये स्पष्टीकरण देत, युजर्सच्या प्रायव्हेट चॅटला व्हॉट्सअॅप अॅक्सेस करू शकत नाही असं सांगितलं आहे. प्रायव्हेट चॅट आणि युजर्सचा डेटा या दोन गोष्टी वेगवेगळ्या असू शकतात. कारण चॅट्सशिवायही व्हॉट्सअॅपवर युजर्सचा डेटा असतो.
व्हॉट्सअॅपने नवी प्रायव्हसी अपडेट केल्यानंतर, याबाबत अनेक सवाल उपस्थित होत आहेत. व्हॉट्सअॅपबाबत अनेक अफवा पसरत असल्याचं म्हणत, कंपनीने ब्लॉगद्वारे स्पष्टीकरण दिलं आहे. नवी अपडेट पॉलिसी मित्र किंवा नातेवाईकांसोबतच्या चॅटला प्रभावित करत नाही, असं कंपनीने म्हटलं आहे. हे प्रायव्हसी अपडेट बिजनेस अकाउंटच्या चॅटबाबत आहे. हे ऑप्शनल आहे. कंपनी कोणत्या प्रकारचा डेटा घेते आणि त्याचा वापर कसा करते हे पूर्णपणे ट्रान्स्परंट आहे.
Whatsapp प्रायव्हेट चॅट अॅक्सेस करू शकतं?
नवी प्रायव्हसी पॉलिसी आल्यापासून युजर्स संभ्रमात आहेत. परंतु व्हॉट्सअॅपने याचं उत्तर दिलं आहे. सर्व चॅट end-to-end encryption ने प्रोटेक्टेड असतात. त्यामुळे कोणीही युजरचं प्रायव्हेट चॅट अॅक्सेस करू शकत नसल्याचा दावा Whatsapp ने केला आहे. तसंच प्रत्येक चॅटमध्ये व्हॉट्सअॅप end-to-end encryption चं लेबल देतं, जेणेकरुन युजर्सला त्यांचं चॅट सुरक्षित असल्याचं समजेल.
WhatsApp युजरच्या मेसेजिंग आणि कॉलिंग डेटाला ट्रॅक करु शकतं का?
या प्रश्नाचं उत्तर देताना व्हॉट्सअॅपने सांगितलं की, याची माहिती केवळ मोबाईल कॅरियर आणि ऑपरेटरकडे असते. कंपनीसाठी दोन बिलियन युजर्सचा डेटा ठेवणं सिक्योरिटी आणि प्रायव्हसी दोघांसाठी धोकादायक आहे. त्यामुळे कंपनी ही माहिती स्टोअर करत नाही.
फेसबुक WhatsApp कॉन्टॅक्ट अॅक्सेस करू शकेल?
WhatsApp ने सांगितलं की, फेसबुक WhatsApp चे कॉन्टॅक्ट तेव्हाच अॅक्सेस करू शकेल, ज्यावेळी युजर त्याची परमिशन देईल. ज्यावेळी युजर याची परमिशन देतो, त्यावेळी फेसबुक केवळ फोन नंबर अॅक्सेस करतो. याची माहिती फेसबुकच्या इतर अॅपशी शेअर केली जात नाही.
WhatsApp ग्रुप चॅट प्रायव्हेट आहे?
WhatsApp ने, सर्व चॅट end-to-end encrypted असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे सेंडर आणि रिसिव्हरशिवाय ते इतर कोणही वाचू शकत नाही.
मेसेज पाठवण्यासाठी आणि स्पॅमपासून वाचण्यासाठी WhatsApp ग्रुप मेंबरशिपचा उपयोग करतो. हा डेटा ऍडसाठी फेसबुकशी शेअर केला जात नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Whatsapp, WhatsApp chats, Whatsapp News