नवी दिल्ली, 13 जानेवारी : गुगलने (Google) अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचं यूट्यूब (YouTube) अकाउंट ब्लॉक केलं आहे. हे डोनाल्ड ट्रम्प यांचं अधिकृत अकाउंट आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांना फेसबुक आणि ट्विटरनेही बॅन केलं होतं. त्यानंतर आता यूट्यूबही ब्लॉक करुन ट्रम्प यांना गुगलने मोठा दणका दिला आहे.
YouTube वरुन डोनाल्ड ट्रम्प यांचं अधिकृत चॅनेल बॅन (Donald Trumps YouTube Account Suspended) करण्यात आलं आहे. आता पुढील कमीत कमी सात दिवसांपर्यंत ट्रम्प YouTube चॅनेलवर कोणताही कॉन्टेंट अपलोड करु शकणार नाहीत.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या यूट्यूब अकाउंटवरुन नवीन व्हिडीओ अपलोड होत नसले, तरी आधीचे व्हिडीओ पाहिले जाऊ शकतात. त्याशिवाय, यूट्यूबने आधीच्या जुन्या व्हिडीओमधून कमेंटचा ऑप्शनही हटवला आहे.
ट्विटरचा डोनाल्ड ट्रम्प यांना जोरदार दणका, अकाउंट केलं कायमचं सस्पेंड!
दरम्यान, ट्विटरने (Twitter) आता ट्रम्प यांचं अकाउंट रिस्टोर केलं आहे. परंतु त्यांनी पुन्हा ट्विटरच्या पॉलिसीचं उल्लंघन केल्यास, अकाउंट कायमचं बॅन केलं जाईल, असा इशारा ट्विटरने ट्रम्प यांना दिला आहे. दुसरीकडे फेसबुकने (Facebook) अनिश्चित काळासाठी ट्रम्प यांचं अकाउंट सस्पेंड केलं आहे.
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या हजारो समर्थकांनी कॅपिटल भवनवर हल्ला केला. या घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर, अशाप्रकारची हिंसा पुन्हा होऊ नये यासाठी सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म ट्विटर, फेसबुक आणि आता यूट्यूबने डोनाल्ड ट्रम्प यांचं अकाउंट बंद केलं आहे. Google ने ट्विट करत सांगितलं की, 'पॉलिसीचं उल्लंघन आणि संभावित हिंसा लक्षात घेता आम्ही डोनाल्ड ट्रम्प यांचं अकाउंट सस्पेंड केलं आहे आणि आता ते नवा कॉन्टेंट अपलोड करू शकत नाही'.
दरम्यान, सिव्हिल राईट ग्रुप्सने Google ला डोनाल्ड ट्रम्प यांचं YouTube Account सस्पेंड करण्यास सांगितलं होतं. असं न केल्यास, सिव्हिल ग्रुप्सने यूट्यूबला वर्ल्ड वाईड Boycott ची धमकी दिली असल्याची माहिती आहे. YouTube वर डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळपास 30 लाख सब्सक्रायबर्स आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.