मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /दिवाळीत Online Shopping करताना सावधान, फसवणुकीपासून वाचण्यासाठी या 10 गोष्टी लक्षात ठेवाच

दिवाळीत Online Shopping करताना सावधान, फसवणुकीपासून वाचण्यासाठी या 10 गोष्टी लक्षात ठेवाच

ऑनलाइन शॉपिंग करताना सतर्क राहणं गरजेचं आहे. लॉगइन, पेमेंट करताना सावधगिरी बाळगणं अत्यावश्यक आहे.

नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर : फेस्टिव्ह सीजनमध्ये ई-कॉमर्स वेबसाइटवर स्मार्टफोन्स आणि इतर वस्तूंवर मोठ्या ऑफर्स दिल्या जातात. Amazon, Flipkart आणि इतर साइट्वर अनेक डिल्स उपलब्ध केल्या जात आहेत. परंतु अनेकदा ग्राहक चुकीची लिंक क्लिक करतात आणि फसवणूक करुन घेतात. त्यामुळे ऑनलाइन शॉपिंग करताना सतर्क राहणं गरजेचं आहे. लॉगइन, पेमेंट करताना सावधगिरी बाळगणं अत्यावश्यक आहे.

एकीकडे डिजीटल ट्रान्झेक्शन वाढत असताना, दुसरीकडे फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. सध्या फेस्टिव्ह सीजनमध्ये ऑनलाइन शॉपिंगमध्ये मोठी वाढ झाली असून अनेक जण डिजीटल पेमेंटचा वापर करत आहेत. परंतु ऑनलाइन पेमेंट करताना काळजी घेणं, सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे.

Online fraud आणि QR Code फसवणुकीपासून असा करा बचाव, या गोष्टी ठरतील फायदेशीर

Online Shopping करताना या 10 गोष्टी लक्षात ठेवाच -

- ज्यावेळी एखाद्या वेबसाइटचा URL https:// पासून सुरू होत असेल, तरच त्यावेळी इंटरनेटवरुन खरेदी करा.

- सुरक्षेच्या दृष्टीने आपला कर्सर URL मध्ये लॉक आयकॉनवर क्लिक करा.

- नेहमी प्रसिद्ध, अधिकृत Amazon, Flipkart, ShopClues, Pepperfry यासारख्या वेबसाइटवरुच खेरदी करा.

- ज्यावेळी ऑनलाइन शॉपिंग कराल, त्यावेळी अँटी-व्हायरस आणि फायरवॉल सॉफ्टवेअर सुरू ठेवा.

- ऑनलाइन शॉपिंगवेळी खासगी माहिती मागितल्यास, देऊ नका.

- थर्ड पार्टी App वरुन, तसंच कोणत्याही लिंकवरुन शॉपिंग करू नका.

- कोणत्याही व्यक्तीने पाठवलेल्या लिंकवर क्लिक करुन ऑफर्सच्या जाळ्यात अडकू नका. तसंच लिंकवरुन कोणतंही App डाइनलोड करू नका.

- अकाउंटचा पासवर्ड नियमितपणे बदला.

- खासगी माहिती फेसबुक, WhatsApp किंवा कोणत्याही मित्रांशी शेअर करू नका.

- फ्री लंच, फ्री शॉपिंग ऑफर आल्यास सतर्क व्हा. कारण ऑनलाइन खरेदी करताना मोफत लंच अशी कोणतीही गोष्ट नसते.

दरम्यान, QR code द्वारे ऑनलाइन पेमेंट करताना कोणीही पाठवलेल्या कोडवर स्कॅन करू नका. पैसे ट्रान्सफर करताना, त्या व्यक्तीचा फोन नंबर किंवा UPI ID वापरणं फायद्याचं ठरेल. यामुळे संपूर्ण ट्रान्झेक्शन सेफ आणि कंट्रोलमध्ये राहील.

First published:
top videos

    Tags: Online payments, Online shopping