मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

WhatsApp वर फोटो-व्हिडीओ कसे कराल Save? एका ट्रिकने स्वत:लाच पाठवता येतील महत्त्वाचे मेसेज

WhatsApp वर फोटो-व्हिडीओ कसे कराल Save? एका ट्रिकने स्वत:लाच पाठवता येतील महत्त्वाचे मेसेज

अनेकांना स्वत:ला मेसेज सेंड करुन आपल्या महत्त्वाच्या बाबी, नोट्स कशा सेव्ह करता येतील याबाबत माहिती नसेल. परंतु काही मेसेज, लिंक पाठवायच्या असतील त्यासाठी एक ट्रिक वापरुन हे काम करता येऊ शकतं.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर : WhatsApp लाँच होऊन आता 12 वर्ष झाली आहेत. यादरम्यान या इन्स्टंट मेसेजिंग App च्या वापरात मोठी वाढ झाली आहे. WhatsApp मध्ये अनेक फीचर्सही जोडले गेले आहेत. पण अनेकांना स्वत:ला मेसेज सेंड करुन आपल्या महत्त्वाच्या बाबी, नोट्स कशा सेव्ह करता येतील याबाबत माहिती नसेल.

WhatsApp वर युजर्सकडे मेसेज फेव्हरेट मार्क करण्याचा, Starred मार्क करण्याचा पर्याय असतो. यामुळे महत्त्वाचा मेसेज, फोटो डिलीट झाला, तरी Starred मार्क असल्यामुळे तो पुन्हा पाहता येतो आणि सेव्ह राहतो. हे फीचर बुकमार्क सारखंच काम करतं. परंतु स्वत:ला इतर आणखी काही मेसेज, लिंक पाठवायच्या असतील त्यासाठी एक ट्रिक वापरुन हे काम करता येऊ शकतं.

विना इंटरनेटही वापरता येईल WhatsApp, जाणून घ्या काय आहे प्रोसेस

ही ट्रिक सोपी असून यासाठी कोणत्याही थर्ड पार्टी App चीही मदत घ्यावी लागणार नाही. तुमच्या WhatsApp वर सोप्या पद्धतीने स्वत:ला मेसेज, लिंक्स किंवा इतर कोणतीही सेव्ह करता येणारी माहिती पाठवता येऊ शकते.

Facebook वर 'जासूस' नातेवाईकांपासून असं लपवा तुमचं प्रोफाइल,हा जुगाड माहितेय का?

WhatsApp वर स्वत:ला कसे पाठवाल मेसेज?

- सर्वात आधी कोणत्याही एका WhatsApp वरील मित्रासोबत WhatsApp Group तयार करा.

- त्यानंतर त्याला WhatsApp Group मधून रिमूव्ह करा.

- त्यामुळे या ग्रुपमध्ये केवळ तुम्हीच राहाल.

- आता तुम्ही या ग्रुपचं नाव आपल्या हिशोबाने सेव्ह करू शकता.

- या ग्रुपचं नाव NOTES किंवा REMINDERS ठेवू शकता.

- त्याशिवाय कोणत्याही नोट्स तुम्हाला लगेच त्या ग्रुपमध्ये ठेवायच्या असल्यास, हा ग्रुप चॅटच्या सर्वात वर ठेवता येईल. त्यासाठी ग्रुपवर लाँग प्रेस करुन टॉप टू पिन करा.

- यामुळे तुम्ही केवळ स्वत:ला मेसेज करुन माहिती सेव्ह करू शकता. परत हवी असलेली माहिती कुठेही शोधाशोध न करता पाहू शकता.

- WhatsApp वर केवळ तीन Chats टॉपवर पिन करता येऊ शकतात.

First published:

Tags: Tech news, WhatsApp chats, Whatsapp group, Whatsapp messages