नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : WhatsApp ने नुकतंच WhatsApp Payment हे नवं फीचर सुरू केलं आहे. WhatsApp Payment या सुविधेचा वापर जास्तीत जास्त युजर्सनी करावा यासाठी काही विशेष ऑफर्स दिल्या जात आहेत. युजर्सना WhatsApp Payment वर कॅशबॅक ऑफर केला जात आहे. WhatsApp Payment ने ऑनलाइन व्यवहार केल्यास 51 रूपयांचा कॅशबॅक दिला जात आहे.
मागील महिन्यात भारतात व्हॉट्सअॅपने UPI वरून युजर्सना पेमेंटची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यानंतर आता WhatsApp Payment फोन पे आणि पेटीएम या पेमेंट्स अॅपला मोठी टक्कर देताना दिसेल. व्हॉट्सअॅपने 'Give Cash, Get 51 back' या नावाने एक बंपर ऑफर सुरू केली आहे. त्या माध्यमातून युजर्सला पेमेंट करून या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार युजर्सने वेगवेगळ्या लोकांना केलेल्या कितीही रुपयांच्या ऑनलाइन व्यवहारांवर हा कॅशबॅक देण्यात येणार आहे.
त्यासाठी कमीत-कमी रकमेची कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही. केवळ 10 रूपयांच्या व्यवहारावरही 51 रूपयांचा कॅशबॅक मिळवता येणार आहे. परंतु हा कॅशबॅक फक्त पाच वेळाच मिळेल. सध्या ही ऑफर Android चं बीटा व्हर्जन असलेल्या व्हॉट्सअॅप युजर्ससाठी देण्यात येत आहे. लवकरच ही ऑफर इतर युजर्ससाठीही खुली करणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.
कंपनी (whatsapp payments in india) आगामी काळात जास्तीत जास्त UPI वर आधारित ऑनलाइन पेमेंट वाढवण्याच्या विचारात आहे. सध्या भारतात PhonePay आणि GooglePay या पेमेंट्स अॅपचा ऑनलाइन व्यवहारांसाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे आता या व्हॉट्सअॅप पेमेंट्सवरील कॅशबॅक ऑफरला या पेमेंट्स अॅपसोबतच्या स्पर्धेच्या रूपात पाहिलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Online payments, WhatsApp features, Whatsapp New Feature