जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / WhatsApp वर Documents पाठवताना विशिष्ट नंबर्स का येतात? वाचा काय आहे यामागचं कारण

WhatsApp वर Documents पाठवताना विशिष्ट नंबर्स का येतात? वाचा काय आहे यामागचं कारण

अशाप्रकारे App डाउनलोड करुन कोणाचंही स्टेटस सेव्ह करू शकता तसंच इतरांसह शेअर करू शकता.

अशाप्रकारे App डाउनलोड करुन कोणाचंही स्टेटस सेव्ह करू शकता तसंच इतरांसह शेअर करू शकता.

डॉक्युमेंट्स पाठवण्यासाठी WhatsApp चा वापर केला जातो. पण WhatsApp वर Documents पाठवताना त्यावर काही नंबर्स लिहिलेले असतात. अनेकांना हे नंबर्स का येतात याबद्दल माहिती नसते. वाचा काय आहे कारण…

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर : WhatsApp चा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. Chat, Video Call, Audio Call, Documents Send अशी अनेक कामं या एका प्लॅटफॉर्मवर केली जातात. एखादी फाईल, फोटो किंवा इतर काही डॉक्युमेंट्स पाठवण्यासाठी WhatsApp चा वापर केला जातो. पण WhatsApp वर Documents पाठवताना त्यावर काही नंबर्स लिहिलेले असतात. अनेकांना हे नंबर्स का येतात याबद्दल माहिती नसते. व्हॉट्सअ‍ॅपवरून युजर्सने पाठवलेल्या डॉक्यूमेंटवर काही विशिष्ट नंबर्स येत असतात. त्याला कोड नंबर असंही म्हटलं जातं. या नंबर्समध्ये त्या डॉक्यूमेंट्सविषयी (documents sending on WhatsApp) महत्त्वाची माहिती लपलेली असते. त्याचबरोबर युजर्सला याच नंबर्सच्या आधारे त्या फाईलबाबत माहिती मिळवता येऊ शकते.

तुमच्या परवानगीशिवाय WhatsApp Group मध्ये कोणीही करू शकणार नाही Add, करा फक्त हे एक काम

हा नंबर म्हणजे फाईलचं नाव असतं. त्यामुळे युजर्स जेव्हा डॉक्यूमेंट्स सेंड करतात त्यावेळी व्हॉट्सअ‍ॅप काही विशिष्ट नंबर्सने त्या फाईलचं नाव सेव्ह करत असतो आणि तोच कोड आपल्याला फाईल सेंड झाल्यानंतर दिसतो. अशा फाईल्सचे कोड नंबर YYYYMMDD_HHMMSS या फॉरमॅटमध्ये असतात. 6G in India: 5G सोबतच सरकार करतंय 6G नेटवर्कचीही तयारी; पाहा किती असेल स्पीड जर फाईल्सचा कोड नंबर हा 20210905_100714 अशा फॉरमॅटमध्ये असेल, तर संबंधित फाईल ही 5 सप्टेंबर 2021 ची असू शकते. त्याचबरोबर काही वेळा हा नंबर डेट, महिना आणि वर्षाच्या आधारावर ठरत असतो. EXPLAINER : End-To-End Encryption असूनही WhatsApp Chats बाहेर कशी येतात? दरम्यान, WhatsApp ने नुकतंच WhatsApp Payment हे नवं फीचर सुरू केलं आहे. WhatsApp Payment या सुविधेचा वापर जास्तीत जास्त युजर्सनी करावा यासाठी काही विशेष ऑफर्स दिल्या जात आहेत. ‘Give Cash, Get 51 back’ या ऑफरद्वारे WhatsApp Payment ने ऑनलाइन व्यवहार केल्यास 51 रूपयांचा कॅशबॅक दिला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात