मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /डार्क मोडमुळे स्मार्टफोनची Battery Life वाढते? संशोधकांनी केला मोठा खुलासा

डार्क मोडमुळे स्मार्टफोनची Battery Life वाढते? संशोधकांनी केला मोठा खुलासा

डार्क मोडमध्ये फोनचा वापर केल्याने बॅटरी लाईफ चांगली राहत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. परंतु संशोधकांनी फोन बॅटरीबाबतच्या लोकांच्या या धारणांना चुकीचं ठरवलं आहे.

डार्क मोडमध्ये फोनचा वापर केल्याने बॅटरी लाईफ चांगली राहत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. परंतु संशोधकांनी फोन बॅटरीबाबतच्या लोकांच्या या धारणांना चुकीचं ठरवलं आहे.

डार्क मोडमध्ये फोनचा वापर केल्याने बॅटरी लाईफ चांगली राहत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. परंतु संशोधकांनी फोन बॅटरीबाबतच्या लोकांच्या या धारणांना चुकीचं ठरवलं आहे.

नवी दिल्ली, 5 ऑगस्ट : स्मार्टफोन दररोजच्या आयुष्यातला महत्त्वाचा भाग झाला आहे. ऑफिसच्या अनेक कामांपासून ते सोशल मीडिया, गेमिंग, चॅटिंग आणि इतरही अनेक कामांसाठी फोनचा वापर केला जातो. फोन आला म्हणजे त्याची बॅटरीही तितकीच महत्त्वाची ठरते. फोनची बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी अनेक युजर्स विविध प्रकारच्या गोष्टी करतात. डार्क मोडमध्ये फोनचा वापर केल्याने बॅटरी लाईफ चांगली राहत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. परंतु संशोधकांनी फोन बॅटरीबाबतच्या लोकांच्या या धारणांना चुकीचं ठरवलं आहे. पुराडे युनिव्हर्स्टिटीच्या संशोधकांनी याबाबत एक अभ्यास प्रसिद्ध केला आहे.

युनिव्हर्स्टिटीकडून करण्यात आलेल्या एका अभ्यासात संशोधकांनी OLED स्क्रीन असणाऱ्या Pixel 2, Moto Z3, Pixel 4 आणि Pixel 5 या चार फोनचा वापर केला. टेस्ट करताना वेगवेगळ्या Android Apps चा वापर केला गेला. हे अॅप्स कॅलेंडर, Google कॅलेंडर, Google Maps, Google फोन आणि YouTube होते. यावर आठ सेकंदासाठी पॉवर ड्रॉ टेस्ट करण्यात आली.

प्रत्येक प्रश्नाचं उत्तर Google Search करता?मानसोपचारतज्ज्ञांचा सावधानतेचा इशारा

या टेस्टनंतर फोन बॅटरीबाबत काही परिणाम समोर आले. जवळपास 30 ते 40 टक्के ब्राइटनेस जो अधिकतर फोनमध्ये डिफॉल्ट रुपात होता, त्यावर डार्क मोडचा अतिशय कमी परिमाण झाला. केवळ 100 टक्के ब्राइटनेस असणाऱ्या फोनवर, डार्क मोड सुरू केल्यानंतर बॅटरीची जवळपास 47 टक्के बचत झाली.

फोन हरवला किंवा चोरी झालाय? IMEI नंबर असा करा ब्लॉक

अतिशय कमी लोक फोनमध्ये 100 टक्के ब्राइटनेस ठेवतात. अनेक जण ब्राइटनेस जवळपास 50 टक्के किंवा त्याहून अधिक ठेवतात. अनेक फोन ऑटो ब्राइटनेसवर ठेवले जातात, जे ब्राइटनेसला ऑटो अॅडजस्ट करतात.

First published:

Tags: Smartphone