जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / प्रत्येक प्रश्नाचं उत्तर Google Search करता? मानसोपचारतज्ज्ञांचा सावधानतेचा इशारा

प्रत्येक प्रश्नाचं उत्तर Google Search करता? मानसोपचारतज्ज्ञांचा सावधानतेचा इशारा

प्रत्येक प्रश्नाचं उत्तर Google Search करता? मानसोपचारतज्ज्ञांचा सावधानतेचा इशारा

Google ने आपलं जीवन अधिक सोपं केलं असलं, तरी कोणत्याही गोष्टीचा अतिवापर नुकसानदायक ठरू शकतो. गरजेहून अधिक एखाद्या गोष्टीचा वापर माणसाला कमकुवत करू शकतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 3 ऑगस्ट : गुगलने (Google) सर्वांचच आयुष्य अधिक सोपं, सोयीचं केलं आहे. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर गुगलवर अगदी एका क्लिकवर सहज मिळतं. खाण्याचे पदार्थ, एखाद्या ठिकाणचा रस्ता, देश-विदेशातील माहिती, आजचा दिवस, तारीख अशा कितीतरी लहान-मोठ्या गोष्टी गुगलवर (Google Search) चुकटीसरशी मिळतात. लहानांपासून-मोठ्यांपर्यंत सर्वच जण सोशल मीडियाचा वापरही मोठ्या प्रमाणात करतात. अनेक जण तर ऑनलाईन गेमिंगच्या (Online Gaming) आहारी गेले आहेत. गुगलने आपलं जीवन अधिक सोपं केलं असलं तरी कोणत्याही गोष्टीचा अतिवापर नुकसानदायक ठरू शकतो. गरजेहून अधिक एखाद्या गोष्टीचा वापर माणसाला कमकुवत करू शकतो. गुगल आणि इंटरनेटवर (Internet) लोक इतक्या मोठ्या प्रमाणात अवलंबून झाले आहेत, की आता याचं रुपांतर मनोविकारात, डिप्रेशनमध्ये (Depression) होत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

पॉर्न पाहण्यात विवाहित स्त्रियांना अधिक रस, अभ्यासातून झाला कारणांचाही खुलासा

इंटरनेट रिचार्ज संपला, वायफाय बंद झालं तर अनेक लोक बेचैन होतात. अनेक लोक तर रिचार्ज संपूच नये यासाठी तो संपण्याआधीच प्री-रिचार्जही करुन ठेवतात. अनेकांकडून सध्या इंटरनेटचा अतिवापर होत असून यामुळे याचे मोठे दुष्परिणामही होऊ शकतात. विविध गोष्टींचं केलेलं सर्च, त्यावर मिळालेल्या माहितीचाही परिणाम होऊ शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. Google वर या गोष्टींचं सर्वाधिक सर्च - कोरोना वॅक्सिन (Corona Vaccine), कोरोना लक्षणं (Corona Symptoms), कोरोनापासून कसा बचाव करायचं (How to avoid Corona), कोरोनावरील उपाय, लॉकडाउन (Lockdown), पीएम किसान योजना (PM Kissan Yojna), पॉर्न फिल्म (Porn Film), पॉर्न फिल्म डाउनलोड लिंक, फिल्मी गाणी (Bollywood Songs), नरेंद्र मोदी (Narendra Modi), रिझल्ट (Result), परिक्षा (Exam), उत्तर प्रदेश निवडणूका (UP Election) अशा प्रकारचं Google Search मोठ्या प्रमाणात करण्यात आलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात