मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Facebook तुम्हाला ट्रॅक करतंय का? असं होत असेल तर कसं सुरक्षित ठेवाल अकाऊंट

Facebook तुम्हाला ट्रॅक करतंय का? असं होत असेल तर कसं सुरक्षित ठेवाल अकाऊंट

`आम्ही युजर्सची प्रायव्हसी जपतो, त्यांचं ट्रॅकिंग करत नाही,` असा दावा फेसबुकने सातत्याने केला असला तरी युजर्सना मात्र वेगळाच अनुभव येतो. `फेसबुक गुप्त पद्धतीने आमच्या हालचालींचं ट्रॅकिंग करतं` असा दावा काही युजर्सनी वेगवेगळ्या वेबसाइटच्या माध्यमातून केला आहे.

`आम्ही युजर्सची प्रायव्हसी जपतो, त्यांचं ट्रॅकिंग करत नाही,` असा दावा फेसबुकने सातत्याने केला असला तरी युजर्सना मात्र वेगळाच अनुभव येतो. `फेसबुक गुप्त पद्धतीने आमच्या हालचालींचं ट्रॅकिंग करतं` असा दावा काही युजर्सनी वेगवेगळ्या वेबसाइटच्या माध्यमातून केला आहे.

`आम्ही युजर्सची प्रायव्हसी जपतो, त्यांचं ट्रॅकिंग करत नाही,` असा दावा फेसबुकने सातत्याने केला असला तरी युजर्सना मात्र वेगळाच अनुभव येतो. `फेसबुक गुप्त पद्धतीने आमच्या हालचालींचं ट्रॅकिंग करतं` असा दावा काही युजर्सनी वेगवेगळ्या वेबसाइटच्या माध्यमातून केला आहे.

पुढे वाचा ...

    नवी दिल्ली, 1 डिसेंबर : गेल्या काही वर्षांत सोशल मीडियाचा (Social Media) वापर वाढला आहे. युजर्स फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करत कोणत्याही गोष्टीवर मतं मांडणं, खासगी आयुष्यातल्या गोष्टी शेअर करणं, विविध विषयांची माहिती देणं, मित्र, कुटुंबीयांसोबत कनेक्टेड आहेत. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सपैकी फेसबुक (Facebook) हा विशेष लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहे. आज अब्जावधी युजर्स फेसबुकचा वापर करतात. मात्र गेल्या काही काळापासून युजर्सच्या प्रायव्हसीच्या (Users Privacy) अनुषंगाने फेसबुक सातत्यानं चर्चेत येत आहे. `आम्ही युजर्सची प्रायव्हसी जपतो, त्यांचं ट्रॅकिंग करत नाही,` असा दावा फेसबुकने सातत्याने केला असला तरी युजर्सना मात्र वेगळाच अनुभव येतो. `फेसबुक गुप्त पद्धतीने आमच्या हालचालींचं ट्रॅकिंग करतं` असा दावा काही युजर्सनी वेगवेगळ्या वेबसाइटच्या माध्यमातून केला आहे.

    जेव्हा तुम्ही खरेदीचा प्लॅन करता किंवा त्याविषयी अन्य व्यक्तींशी चर्चा करता त्यानंतर तुम्ही चर्चा केलेल्या उत्पादनांच्या जाहिराती अचानक रात्रीच्या वेळी तुमच्या फेसबुक अकाउंटवर दिसू लागतात. `आम्ही युजर्सचं बोलणं ऐकण्यासाठी त्यांच्या फोनमधल्या मायक्रोफोनचा वापर करत नाही,` असं फेसबुकने यापूर्वी सांगितलं आहे. परंतु, फेसबुकला बाजूला ठेवून अन्य ई-कॉमर्स वेबसाइट्सवर एखादं उत्पादन खरेदीकरता शोधत असाल तर तुमचं ट्रॅकिंग होत असल्याचं लक्षात येतं.

    `मी जेव्हा ई-कॉमर्स वेबसाइटवर (E-Commerce Website) एखादं उत्पादन खरेदीकरता सर्च करतो, तेव्हा माझ्या फेसबुकवर अचानक त्या उत्पादनाच्या जाहिराती सुरू होतात. असं अनेकदा घडलं आहे. काही दिवसांपूर्वी असंच झालं. मी दाढी करण्यासाठीचा ट्रिमर अ‍ॅमेझॉनवर (Amazon) शोधत होतो. रात्रीच्या वेळी मी माझं फेसबुक फीड पाहत असताना अचानक ट्रिमरच्या जाहिराती सुरू झाल्या,` असं मुंबईतल्या कायद्याचा विद्यार्थी असलेल्या नवनीत यानं सांगितलं.

    Smartphone चोरी झाल्यास असं सुरक्षित ठेवा PhonePe Account, लगेच करा हे काम

    खरं तर युजर्स ट्रॅकिंगच्या अनेक पद्धती आहेत. ऑफ-फेसबुक अ‍ॅक्टिव्हिटी टूल्सच्या (Off - Facebook Activity Tools) माध्यमातूनही युजर्सचं ट्रॅकिंग (Tracking) केलं जाऊ शकतं. कंपनीने 2020 मध्ये हे टूल लॉंच केलं होतं. त्यामध्ये अशा वेबसाइट्स, व्यवसाय आणि संस्थांची सूची दाखवली जाते, की ज्यांच्याशी तुम्ही तुमची फेसबुक क्रेडन्शियल्स वापरून संवाद साधला होता. मात्र याविषयी सावध भूमिका घेऊन फेसबुकने म्हटलं आहे, की `हे टूल युजर्सना चांगला पर्सनल एक्सपीरियन्स देण्यासाठी मदत करतं.` तुमच्या फेसबुक अकाउंटवर तुम्हाला ऑफ फेसबुक डिस्कनेक्ट करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. परंतु, जे अनेक गोष्टींमध्ये युजर्सची सेटिंग्ज बदलून त्रासदायक ठरलं आहे, असं काही टूल आहे असल्याविषयी बरेच जण अनभिज्ञ आहेत.

    अशा अनेक गोष्टी आहेत, की ज्या माध्यमातून ही सोशल मीडिया कंपनी युजर्सवर नजर ठेवण्याचं काम करते. यात लोकेशन फीचर (Location Feature) महत्त्वाची भूमिका बजावतं. जेव्हा एखादा युजर फेसबुक डाउनलोड करतो, तेव्हा त्याला लोकेशन अ‍ॅक्सेस (Location Access) अप्रूव्हल मागितलं जातं आणि युजर नकळतपणे त्यावर क्लिक करतो. अशा प्रकारचं ट्रॅकिंग रोखण्यासाठी युजर फेसबुक अ‍ॅपचा लोकेशन अ‍ॅक्सेस स्विच ऑफ करू शकतो. परंतु, चेक-इन, इव्हेंट आणि अगदी इंटरनेट कनेक्शनच्या माध्यमातूनही फेसबुक तुमच्या लोकेशनची माहिती मिळवू शकतं.

    Alert! 3लाख Androidयुजर्सकडे धोकादायक Apps,पासवर्ड चोरीमुळे बँकेतील पैसे धोक्यात

    `स्पेशल लोकेशन डिटेल्स (Special Location Details) म्हणजेच तुमच्या डिव्हाइसचा जीपीएस सिग्नल आणि कनेक्शनची माहिती, वायफाय कनेक्शन किंवा आयपी अ‍ॅड्रेस या माध्यमातून तुम्ही नेमकं कुठे आहात, याची माहिती आम्हाला सहज मिळू शकते,` असं फेसबुकनं एका ब्लॉगमध्ये म्हटलं होतं.

    `युजर्सला चांगला रिलेटेड आणि पर्सनल एक्सिपीरिअन्स मिळावा, अकाउंट सुरक्षित राहावं आणि चांगल्या जाहिराती त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात यासाठी लोकेशन तपशीलाचा वापर केला जातो,` असं फेसबुकनं म्हटलं आहे.

    Aadhaar Card हरवलंय? Online असा शोधा आधार नंबर

    फेसबुकनं तुमची ऑनलाइन अ‍ॅक्टिव्हिटी (Online Activity) जाणून घेऊ नये, केवळ सोशल मीडियापर्यंतच याचा अ‍ॅक्सेस मर्यादित राहावा, असं युजरना वाटत असेल, तर फेसबुकपासून तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटी डिस्कनेक्ट करण्यासाठी काही उपाययोजनांचा अवलंब करणं आवश्यक आहे. यात सर्वप्रथम युजरने आपल्या फेसबुक अकाउंटवर लॉगिन करुन सेटिंग-प्रायव्हसी पेजवर जा. त्यानंतर सेटिंग्जवर क्लिक करा. त्यानंतर डावीकडे असलेल्या कॉलममधल्या फेसबुक माहितीवर क्लिक करा. आता ऑफ-फेसबुक अ‍ॅक्टिव्हिटीवर क्लिक करा. More वर क्लिक करून मॅनेज फ्युचर अ‍ॅक्टिव्हिटी हा पर्याय निवडा. इथे तुम्हाला फेसबुक पासवर्ड विचारला जाईल. त्यावर पासवर्ड एंटर करावा. यानंतर तुम्हाला एक पॉप-अप पेज दिसेल. मॅनेज फ्युचर अ‍ॅक्टिव्हिटी या पर्यायावर क्लिक करा आणि ऑफ-फेसबुक अ‍ॅक्टिव्हिटी बंद करा.

    First published:
    top videos

      Tags: Facebook, Tech news