मराठी बातम्या » फोटोगॅलरी » टेक्नोलाॅजी » Smartphone चोरी झाल्यास असं सुरक्षित ठेवा PhonePe Account, लगेच करा हे काम

Smartphone चोरी झाल्यास असं सुरक्षित ठेवा PhonePe Account, लगेच करा हे काम

सध्या स्मार्टफोन प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचा झाला आहे. आता फोनमध्ये केवळ कॉन्टॅक्ट नंबर, गाणी, फोटो इतकंच नाही, तर अनेक सोशल मीडिया अकाउंट्स (Social Media Accounts), बँक अकाउंट्स (Bank Account), ऑनलाईन पेमेंट अकाउंट्स सेव्ह (Online Payment Apps) असतात. अशात कधी मोबाईल हरवला तर मोठी समस्या निर्माण होते. फोन हरवल्यास सेव्ह असलेल्या बँक अकाउंट्स, पेमेंट अ‍ॅप्सचा चुकीचा वापर होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे फोन हरवल्यानंतर लगेचच हे पेमेंट अ‍ॅप्स ब्लॉक (Online Payment Apps Block) करणं सर्वात सुरक्षित पर्याय ठरतो.