मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Aadhaar Card हरवलंय? Online असा शोधा आधार नंबर

Aadhaar Card हरवलंय? Online असा शोधा आधार नंबर

जर तुमचंही आधार कार्ड हरवलं असेल आणि आधार नंबर लक्षात नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. काही सोप्या पद्धतीने ऑनलाइन आधार नंबर काढता येऊ शकतो.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर : Aadhaar Card प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. खासगी तसंच सर्वच सरकारी कामांसाठी आधार कार्डची गरज लागते. आधार कार्ड Unique Identification Authority of India (UIDAI) कडून जारी केलं जातं. आधार कार्डवर व्यक्तीचे पर्सनल डिटेल्स आणि पत्ता लिहिलेला असतो. आधार कार्डवर 12 अंकी एक नंबर लिहिलेला असतो, त्याला आधार नंबर म्हणतात.

अनेकांकडून आधार कार्ड हरवलं जातं. अशात आधार नंबर लक्षात नसेल, माहित नसेल तर मोठी समस्या निर्माण होते. जर तुमचंही आधार कार्ड हरवलं असेल आणि आधार नंबर लक्षात नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. काही सोप्या पद्धतीने ऑनलाइन आधार नंबर काढता येऊ शकतो.

Aadhaar Card मध्ये असा अपडेट करा Address, पाहा सोपी प्रोसेस

- ऑनलाइन आधार नंबर मिळवण्यासाठी मोबाइल नंबर आधार कार्डशी लिंक असणं गरजेचं आहे. कारण या प्रोसेसमध्ये तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एक OTP येतो. नंबर रजिस्टर्ड असेल, तर आधार नंबर ऑनलाइन मिळवता येतो.

- सर्वात आधी UIDAI च्या अधिकृत वेबसाइट https://resident.uidai.gov.in/ वर जावं लागेल.

- होम पेज स्क्रॉल डाउन करुन खाली Aadhaar Service वर क्लिक करा.

- इथे अनेक पर्याय दिसतील. त्यापैकी Retrieve Lost or Forgotten EID/UID वर क्लिक करा.

- त्यानंतर एका पेजवर पोहोचाल.

- इथे Aadhaar No चा पर्याय सिलेक्ट करावा लागेल.

- त्यानंतर पूर्ण नाव, मोबाइल नंबर किंवा ईमेल आयडी टाकावा लागेल.

- आता कॅप्चा कोड टाकून Send OTP वर क्लिक करा.

- रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर OTP येईल.

- OTP टाकून सबमिट करा. इथे आधार नंबर तुमच्या मोबाइल किंवा ईमेल आयडीवर येईल.

First published:

Tags: Aadhar card, M aadhar card