मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /...तर Online ticket book करता येणार नाही, जाणून घ्या बुकिंगसाठी IRCTC चा नवा नियम

...तर Online ticket book करता येणार नाही, जाणून घ्या बुकिंगसाठी IRCTC चा नवा नियम

कोरोना संक्रमणामुळे अनेक काळापासून तिकीट बुक न केलेल्या प्रवाशांसाठी रेल्वेने हा नवा नियम केला आहे.

कोरोना संक्रमणामुळे अनेक काळापासून तिकीट बुक न केलेल्या प्रवाशांसाठी रेल्वेने हा नवा नियम केला आहे.

कोरोना संक्रमणामुळे अनेक काळापासून तिकीट बुक न केलेल्या प्रवाशांसाठी रेल्वेने हा नवा नियम केला आहे.

नवी दिल्ली, 28 जुलै: ऑनलाईन तिकीट (Online Ticket) काढणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिजम कॉर्पोरेशन अर्थात IRCTC वरुन ऑनलाईन तिकीट खरेदी करणाऱ्यांना आता मोबाईल नंबर आणि ईमेल वेरिफिकेशन करावं लागणार आहे. या वेरिफिकेशननंतरच तिकीट घेता येणार आहे. हा नियम अशा प्रवशांसाठी आहे, ज्यांनी अनेक कालावधीपासून पोर्टलवरुन तिकीट खरेदी केलेलं नाही.

कोरोना संक्रमणामुळे अनेक काळापासून तिकीट बुक न केलेल्या प्रवाशांसाठी रेल्वेने हा नवा नियम केला आहे. अशा लोकांना आयआरसीटीसीच्या पोर्टलवरुन तिकीट खरेदी करण्यापूर्वी आपला मोबाईल नंबर आणि ईमेल वेरिफिकेशन करावं लागेल. त्यानंतरच तिकीट मिळेल. परंतु नियमित तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना ही प्रक्रिया करावी लागणार नाही.

भारतीय रेल्वे (Indian Railway) अंतर्गत IRCTC ऑनलाईन तिकीटाची विक्री करतं. तिकीट खरेदी करण्यासाठी प्रवासी या पोर्टलवर लॉगइन आणि पासवर्ड तयार करू शकतात. त्यानंतर ऑनलाईन बुकिंग (Online Ticket Booking) सुविधेचा लाभ घेऊ शकतात. लॉगइन, पासवर्ड बनवण्यासाठी ईमेल आणि फोन नंबरची माहिती द्यावी लागते. ईमेल आणि फोन नंबर वेरिफाय झाल्यानंतर तिकीट बुक करू शकता.

डेबिट कार्डवरच्या 16 आकडी नंबरचा अर्थ काय? लपलं आहे गुपित

कोरोनाचा कहर काहीसा कमी झाल्यानंतर आता ट्रेनदेखील सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तिकीट विक्रीमध्ये वाढ झाली आहे. सध्या 24 तासात जवळपास 8 लाख रेल्वे तिकीट बुक होतात. IRCTC दिल्ली मुख्यालयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान IRCTC पोर्टलवर जे अकाउंट निष्क्रिय होते, ते पुन्हा सुरू करण्यासाठी मोबाईल नंबर आणि ईमेल वेरिफिकेशन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Alert! Fraud करण्यासाठी सायबर क्रिमिनल्सकडून केला जातो या ट्रिकचा वापर

कसं कराल वेरिफिकेशन?

IRCTC पोर्टलवर लॉगइन केल्यानंतर वेरिफिकेशन विंडो ओपन होते. इथे आधीपासूनच रजिस्टर्ड ईमेल आणि मोबाईल नंबर टाका. आता एडिट आणि वेरिफिकेशन असे पर्याय दिसतील. Edit पर्यायात फोन नंबर-ईमेल बदलता येईल. वेरिफिकेशन पर्याय निवडल्यानंतर तुमच्या नंबरवर एक ओटीपी येईल. ओटीपी टाकल्यानंतर मोबाईल नंबर वेरिफाय होईल. अशाच प्रकारे ईमेल वेरिफिकेशनही करता येईल.

First published:

Tags: Indian railway, IRCTC