मराठी बातम्या /बातम्या /मनी /डेबिट कार्डवरच्या 16 आकडी नंबरचा अर्थ काय? लपलं आहे गुपित

डेबिट कार्डवरच्या 16 आकडी नंबरचा अर्थ काय? लपलं आहे गुपित

सध्याच्या डिजीटल युगात डेबिट कार्ड (Debit Card) ही आपली दैनंदिन गरज बनली आहे. डेबिट कार्डच्या रुपाने आपले बँक अकाउंट (Bank Account) आपल्या खिशात सामावलेले असते, असं म्हणलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही.

सध्याच्या डिजीटल युगात डेबिट कार्ड (Debit Card) ही आपली दैनंदिन गरज बनली आहे. डेबिट कार्डच्या रुपाने आपले बँक अकाउंट (Bank Account) आपल्या खिशात सामावलेले असते, असं म्हणलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही.

सध्याच्या डिजीटल युगात डेबिट कार्ड (Debit Card) ही आपली दैनंदिन गरज बनली आहे. डेबिट कार्डच्या रुपाने आपले बँक अकाउंट (Bank Account) आपल्या खिशात सामावलेले असते, असं म्हणलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही.

  मुंबई, 28 जुलै : सध्याच्या डिजीटल युगात डेबिट कार्ड (Debit Card) ही आपली दैनंदिन गरज बनली आहे. डेबिट कार्डच्या रुपाने आपले बँक अकाउंट (Bank Account) आपल्या खिशात सामावलेले असते, असं म्हणलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण आज अनेक आर्थिक व्यवहार डेबिट कार्डच्या मदतीने केले जातात. कोरोना काळात डिजीटल व्यवहारांवर अधिक भर दिला जात आहे, त्यामुळे पुन्हा एकदा डेबिट कार्डचे महत्व अधोरेखित झाले आहे. हे डेबिट कार्ड तुम्ही कधी बारकाईने निरखून पाहिले आहे का? या प्रश्नावर कदाचित होय किंवा नाही अशी संमिश्र उत्तरे येऊ शकतात. डेबिट कार्डवरील प्रत्येक अंकाचे, चीपचे विशेष असे महत्व आहे, त्याला एक अर्थ आहे. या अंकांचे महत्व, उपयुक्तता जाणून घेऊया.

  डेबिट कार्डने सर्वसामान्य नागरिकांसाठी बँकिंग सेवा (Banking Service) सुलभ बनवली आहे. त्यामुळे खरेदीसाठी घराबाहेर पडताना तुम्हाला आता रोख रक्कम जवळ बाळगण्याची गरज उरलेली नाही. कारण डेबिट कार्ड हे तुमच्या बॅंक खात्याशी जोडलेले असते आणि त्या माध्यमातून 24 तास आणि 7 दिवस बॅंकिंग सेवा उपलब्ध होते. मात्र या सुविधेसाठी एक अट असते, ती म्हणजे गरजेइतकी रक्कम तुमच्या बॅंक अकाउंट उपलब्ध हवी. प्रत्येक डेबिट कार्ड 16 अंकी कोड (16 Digit Code) आणि सीव्हीव्ही (CVV) असतो.

  कोणत्याही डेबिट कार्डावर 16 अंकी कोड लिहिलेला असतो. डिजीटल पेमेंट करते वेळी हा 16 अंकी कोड तुम्हाला द्यावा लागतो. यातील पहिले 6 अंक हे बॅंक आयडेंटिफिकेशन क्रमांक (Bank Identification Number) असतात. आणि त्यानंतरच्या 10 अंकांना युनिक अकाउंट क्रमांक (Unique Account Number) म्हटलं जातं. तुमच्या डेबिट कार्डवरील ग्लोबल हॉलोग्राम (Global Hollow gram) हा सिक्युरिटी होलोग्राम असतो आणि तो 3D असल्यानं कॉपी करणं अशक्य असतं. त्यानंतर कार्डावर एक्सपायरी डेट नमूद केलेली असते. 16 अंकी कोडमध्ये पहिला अंक कोणत्या इंडस्ट्रीने संबंधित कार्ड जारी केले आहे ते दर्शवतो. याला मेजर इंडस्ट्री आयडेंटीफाय (MII) असं म्हटलं जातं. विविध इंडस्ट्रीजसाठी हा अंक वेगवेगळा असतो. जसं की

  1-ISO

  2- एअरलाईन्स

  3- एअरलाईन्स आणि अन्य इंडस्ट्रीज

  4- ट्रॅव्हल अँड एंटरटेनमेंट

  5- बँकिंग अँड फायनान्स

  6- बँकिंग अँड फायनान्स

  7- बँकिंग अँड मर्चंडाईजिंग

  8- पेट्रोलियम

  9- टेलिकॉम आणि अन्य इंडस्ट्रीज

  पहिल्या 6 अंकांमुळे संबंधित कार्ड कोणत्या कंपनीनं जारी केलं आहे हे समजतं. याला इश्युअर आयडेंटिफिकेशन क्रमांक (IIN) म्हणतात.

  मास्टर कार्ड (Master Card) - 5xxxxx

  व्हिसा कार्ड (Visa Card) – 4xxxxx

  यानंतरचे 7 ते 15 क्रमांक असतात ते तुमच्या बॅंक अकाउंटशी संलग्न असतात. मात्र हा बॅंक अकाउंट नंबर नसून तो तुमच्या बँक अकाउंटशी जोडलेला असतो. हा युनिक क्रमांक असल्याने अन्य कोणाही व्यक्तीला तुमच्या बँक अकाउंटची माहिती मिळत नाही. कोणत्याही डेबिट कार्डावरील शेवटचा क्रमांक चेकसम असतो. यामुळे तुमचे कार्ड व्हॅलिड आहे की नाही हे समजते. ऑनलाइन पेमेंटवेळी (Online Payment) आवश्यक असणारा सीव्हीव्ही हा 3 अंकी असतो आणि तो डेबिट कार्डाच्या पाठीमागील बाजूस प्रिंट केलेला असतो.

  कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन पेमेंट करते वेळी या अंकांच्या मदतीने पेमेंट सिस्टीम हे कार्ड कोणत्या कंपनीने जारी केले आहे याची माहिती मिळवते. तसेच यामुळे तुमच्या बॅंक अकाउंटचीही माहिती मिळते. तसेच या अंकांमुळेच तुमचं डेबिट कार्ड सुरक्षित राहतं आणि ते हरवलं तरी कोणी अन्य व्यक्ती त्याद्वारे रक्कम डेबिट शकत नाही.

  First published:

  Tags: Shopping debit card