Home /News /technology /

पायलटकडून 11250 फूटांवरुन खाली पडला iPhone, पुढे काय झालं पाहून तुम्हीही व्हाल हैराण

पायलटकडून 11250 फूटांवरुन खाली पडला iPhone, पुढे काय झालं पाहून तुम्हीही व्हाल हैराण

एका पायलटचा iPhone X तब्बल 11250 फूटांवरुन खाली पडल्यानंतरही सुस्थितीत असल्याचं समोर आलं आहे.

  नवी दिल्ली, 20 ऑगस्ट : अनेकांमध्ये iPhone ची मोठी क्रेझ असते. आयफोन महागडा असला, तरी त्याची मजबूती, फीचर्स जबरदस्त असल्याने त्याची नेहमीच चर्चा होते. आयफोनच्या मजबूतीची अनेक उदाहरणं असताना आता पुन्हा एकदा याबाबतची एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. एका पायलटचा iPhone X तब्बल 11250 फूटांवरुन खाली पडल्यानंतरही सुस्थितीत असल्याचं समोर आलं आहे. इतक्या उंचावरुन पडूनही फोन चालू स्थितीत होता. डायमंड एविएटर्स फोरम पायलट डेव्हिडने याबाबत खुलासा केला आहे. एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, की आपल्या डायमंड DA40 प्लेनमध्ये कोलोराडो स्प्रिंग्सहून अटलांटासाठी त्यांनी उड्डाण केलं. त्यावेळी त्यांनी DA40 च्या लहानशा साईड खिडकीतून ढगांचा फोटो काढण्यासाठी iPhone X काढला आणि तो हातातून निसटला. त्यांनी सांगितलं, की विमानात साईड खिडकी ओपन करता येऊ शकते आणि त्यातून फोटोही काढता येतात. परंतु या खिडक्या ओपन केल्यानंतर अतिशय वेगात एअरस्ट्रिम जनरेट होते. डेव्हिड यांनी अशारितीने अनेक फोटो काढले आहेत. मात्र त्यादिवशी या खिडकीमधून फोटो काढताना त्यांचा iPhone X हातातून निसटला आणि थेट 11000 फूटांवरुन खाली आला.

  VIDEO: फटक्यांमध्ये बंद केला iPhone 11 pro, डब्ब्याला आग लावली आणि...

  दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना मोठा धक्काच बसला. ते आपल्या हरवलेल्या फोनमधून डेटा हटवण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी त्यांच्या iPhone X ने लोकेशन दाखवलं. लगेचच डेव्हिड त्या जागी गेले आणि तिथे शोधाशोध केल्यानंतर त्यांना त्यांचा फोन मिळाला. फोनची दुर्दशा झाली असेल असा समज झालेल्या डेव्हिड यांना फोन पाहून मोठा धक्काच बसला. त्यांच्या फोनला एकही स्क्रॅच आला नव्हता.

  आश्चर्यच आहे! वर्षभर पाण्यात राहूनही चालू स्थितीत राहिला iPhone 11 Pro Max

  इतक्या उंचावरुन पडूनही आयफोन एक्सला एक स्क्रॅचही न येण्यामागे त्यांनी फोनला Otterbox डिफेंडर सीरिजचं कव्हर असल्याचं कारण सांगितलं. हे कव्हर त्यांनी 2018 मध्ये खरेदी केलं होतं. इतके वर्ष होऊनही कव्हरसह फोनही उंचावरुन पडून सुरक्षित राहिला, चालू स्थितीत होता. डेव्हिडने Apple आणि Otterbox च्या मजबूतीला सलाम केला असून इतक्या मोठ्या धक्क्यानंतरही फोन चालू असल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Apple, Iphone, Smartphone

  पुढील बातम्या