मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /आज Apple चा मेगा इव्हेंट, लाँच होणार iPhone 13 सीरिजसह हे प्रोडक्ट; इथे पाहता येईल LIVE

आज Apple चा मेगा इव्हेंट, लाँच होणार iPhone 13 सीरिजसह हे प्रोडक्ट; इथे पाहता येईल LIVE

iPhone 13 लाइनअपच्या लाँचिंगसाठी व्हर्च्युअल इव्हेंटची सुरुवात 14 सप्टेंबरला भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजता होणार आहे.

iPhone 13 लाइनअपच्या लाँचिंगसाठी व्हर्च्युअल इव्हेंटची सुरुवात 14 सप्टेंबरला भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजता होणार आहे.

iPhone 13 लाइनअपच्या लाँचिंगसाठी व्हर्च्युअल इव्हेंटची सुरुवात 14 सप्टेंबरला भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजता होणार आहे.

नवी दिल्ली, 14 सप्टेंबर : Apple iPhone 13 चा आज 14 सप्टेंबर रोजी लाँच इव्हेंटचं  होणार आहे. या व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये Apple Watch Series 7 स्मार्टवॉचही लाँच केलं जाऊ शकतो. तसंच थर्ड जनरेशन AirPods देखील लाँच होण्याची शक्यता आहे. iPhone 13 लाइनअपच्या लाँचिंगसाठी व्हर्च्युअल इव्हेंटची सुरुवात 14 सप्टेंबरला भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजता होणार आहे.

या इव्हेंटमध्ये iPhone 13 mini, iPhone 13, iPhone 13 pro आणि iPhone 13 pro max लाँच होण्याची शक्यता आहे. इव्हेंटचं लाईव्ह स्ट्रिमिंग अधिकृत यूट्यूब चॅनलवर https://www.youtube.com/watch?v=EvGOlAkLSLw पाहता येईल.

iPhone 13 Series स्पेसिफिकेशन्स -

iPhone 13 आणि iPhone 13 mini फोन 64GB आणि 128GB स्टोरेज वेरिएंटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. लीक्सनुसार, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max साठी 1TB स्टोरेज मॉडेल लाँच केलं जाऊ शकतं. 14 सप्टेंबर लाँचिंगनंतर 17 सप्टेंबरपासून प्री-बुकिंग सुरू होणार असून, 24 सप्टेंबरपासून सर्व फोनची विक्री सुरू केली जाईल, अशी माहिती आहे.

अ‍ॅपलच्या iPhone 13 बाबत अनेक लीकमधून फीचर्स समोर आले आहेत. नव्या iPhone 13 मध्ये लो अर्थ ऑरबिट (LEO) सॅटेलाईट कम्युनिकेशन कनेक्टिव्हिटी देण्यात येईल. ज्यामुळे युजर्स विना 4G आणि 5G कव्हरेजही कॉल आणि मेसेज पाठवू शकतील. रिपोर्ट्सनुसार, iPhone 13 लाइनअप सॅटेलाईट फीचरसह असू शकतं. यामुळे युजर्स प्लेन क्रॅश होण्याच्या किंवा जहाज डुबण्यासारख्या स्थितीतही इमरजेन्सी मेसज करू शकतील. परंतु हे फीचर सर्वच ठिकाणी असणार नाही.

कार क्रॅशमध्ये Tata च्या या गाडीचा झाला चुराडा, पुन्हा खरेदी केली तिच कार

Watch Series 7 -

iPhone 13 सीरिजसह इव्हेंटमध्ये वॉच सीरिज 7 देखील लाँच केली जाऊ शकते. कंज्युमर टेक इंडस्ट्री एक्सपर्ट ब्लूमबर्गचे मार्क गरमॅन यांनी दिलेल्या माहितीनुसार, अ‍ॅपल लाँच इव्हेंटमध्ये वॉच सीरिज लाँच करेल. त्याशिवाय या घोषणेनंतर वॉच लिमिटेड मर्यादेत उपलब्ध केलं जाईल. हे वॉच नव्या डिझाईनसह लाँच होईल. तसंच वॉचमध्ये फ्लॅट डिस्प्ले, अपडेटेड स्क्रिन टेक्नोलॉजी दिली जाईल, तसंच फास्ट प्रोसेसरदेखील असणार असल्याची माहिती आहे.

First published:
top videos

    Tags: Apple, Iphone