नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी : नवा iPhone घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. ही डील फायदेशीर ठरू शकते, कारण नवा Apple iPhone 13 कमी किमतीत खरेदीची संधी आहे. ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर (Flipkart iPhone Offer) iPhone 13 च्या अनेक वेरिएंटवर विविध ऑफर्स दिल्या जात आहेत. या ऑफर्समध्ये तुलनेने स्वस्त दरात आयफोन खरेदी करता येऊ शकतो. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर (Flipkart) Apple iPhone 13 वर मोठा डिस्काउंट, एक्सचेंज ऑफर आणि बँक ऑफर्स दिल्या जात आहेत. या ऑफर्सच्या आधारे iPhone 13 तुम्ही 79,900 रुपयांऐवजी 59,400 रुपयांत खरेदी करू शकता.
हे वाचा - की-बोर्डवर ABCD अशा क्रमाने का नसतात अक्षरं? काय आहे यामागची कहाणी?
काय आहे ऑफर? Flipkart वर Apple iPhone 128 GB स्टोरेज वेरिएंट 13 74,900 रुपयांत खरेदी करता येईल. खरेदीवेळी तुम्ही अॅक्सिस बँक क्रेडिट (Axis Bank Credit Card) कार्डचा वापर केल्यास 5 टक्के डिस्काउंट मिळेल. जर iPhone 13 एक्सचेंज ऑफरमध्ये खरेदी केला, तर तुम्ही 15,500 रुपयांची सूट मिळवू शकता. एक्सचेंज ऑफरमध्ये फोनची किंमत कमी होऊन 59,400 रुपये होते. iPhone 13 256 GB वेरिएंटची किंमत 89,900 रुपये आहे. फ्लिपकार्टवर 5 टक्क्यांच्या सूटसह हा फोन 84,900 रुपयांत खरेदी करता येईल. या फोनवर 15,500 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डवर 5 टक्क्यांचा अनलिमिटेड कॅशबॅकही मिळेल. iPhone 13 512 GB वेरिएंट ई-कॉमर्स वेबसाइटवर 4 टक्क्यांच्या सूटसह 1,04,900 रुपयांत मिळेल. या फोनवर एक्सचेंज ऑफर देण्यात आलेली नाही. बँक ऑफरपैकी फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर 5 टक्क्यांचा अनलिमिटेड कॅशबॅक दिला जात आहे.
हे वाचा - Google Maps द्वारे केवळ लोकेशनच नाही, तर आता कमाई करण्याचीही संधी, पाहा डिटेल्स
iPhone 13 फीचर्स - Apple iPhone 13 ला 6.10 इंची Super Retina XDR OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्ले रेजोल्यूशन 1170×2532 पिक्सल देण्यात आल आहे. हा फोन iOS 15 वर ऑपरेट होतो. फोनला 3240 mAh ची बॅटरी देण्यात आली असून ही 23W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. iPhone 13 बॅक पॅनलला f/1.6 अपर्चरसह 12 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. तसंच f/2.4 अपर्चरसह 12 मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा आहे. iPhone ला f/2.2 अपर्चरसह 12 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.