मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

की-बोर्डवर ABCD अशा क्रमाने का नसतात अक्षरं? जाणून घ्या की-बोर्डच्या जन्माची कहाणी

की-बोर्डवर ABCD अशा क्रमाने का नसतात अक्षरं? जाणून घ्या की-बोर्डच्या जन्माची कहाणी

कम्प्युटरच्या की-बोर्डवर (key Board) ABCD ही अक्षरे सरळ रांगेत का नाही? असा प्रश्न तुम्हालाही कधी ना कधी पडला असेल. तर यामागे मोठी कहाणी आहे. चला जाणून घेऊया.

कम्प्युटरच्या की-बोर्डवर (key Board) ABCD ही अक्षरे सरळ रांगेत का नाही? असा प्रश्न तुम्हालाही कधी ना कधी पडला असेल. तर यामागे मोठी कहाणी आहे. चला जाणून घेऊया.

कम्प्युटरच्या की-बोर्डवर (key Board) ABCD ही अक्षरे सरळ रांगेत का नाही? असा प्रश्न तुम्हालाही कधी ना कधी पडला असेल. तर यामागे मोठी कहाणी आहे. चला जाणून घेऊया.

मुंबई, 22 फेब्रुवारी : तुम्ही पहिल्यांदा कम्प्युटर (computer) वापरायला कधी शिकलात, ते आठवतं का? काहींना आठवत असेल तर काहींना नसेल आठवत; पण तुम्ही टायपिंग (typing) करायला कधी शिकलात, हे नक्कीच आठवत असेल. याचं कारण म्हणजे की-बोर्ड. आपण शाळेत ABCD अशा क्रमाने अक्षरं शिकलो; पण की-बोर्ड वापरताना त्यावर एबीसीडी या क्रमाने अक्षरं लिहिलेली नसतात. त्यामुळे टाइप करताना अक्षरं शोधण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. टायपिंग शिकत असताना जेव्हा शब्द शोधण्यासाठी वेळ लागायचा तेव्हा सगळ्यांनाच वाटलं असेल, की की-बोर्ड बनवणारा किती मूर्ख आहे. ही अक्षरं सरळ ABCD अशा क्रमाने लिहिली असती तर टायपिंग कितं सोपं झालं असतं; पण एकदा टायपिंग शिकलो की मग सगळे शब्द मोजक्या वेळात टाइप करून पूर्ण होतात. की-बोर्डवरची अक्षरं अशी उलटसुलट क्रमाने का लिहिलेली असतात, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का किंवा तुम्ही याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलाय का. नसेल केला तर ही बातमी वाचाच. की-बोर्डवरच्या अक्षरांची कहाणी खूपच रंजक आहे. की-बोर्डचा इतिहास की-बोर्डचा इतिहास (history of keyboard) टाइपरायटरशी (typewriter) जोडलेला आहे. म्हणजेच कम्प्युटर (computer) किंवा की-बोर्ड येण्याच्या आधीपासूनच QWERTY फॉरमॅट सुरू आहे. 1868 मध्ये, टाइपरायटरचा शोध लावणाऱ्या क्रिस्टोफर लॅथम शॉल्सने (Christopher Latham Sholes) पहिल्यांदा ABCDE... अशा क्रमाने अक्षरं वापरून की-बोर्ड बनवला; पण त्यावर अपेक्षित गतीने आणि सोयीस्कर टायपिंग होत नसल्याचं दिसून आलं. यासोबतच Keys बद्दलही अनेक समस्या समोर येत होत्या. Google Maps द्वारे केवळ लोकेशनच नाही, तर आता कमाई करण्याचीही संधी, पाहा डिटेल्स कसा तयार झाला की-बोर्डचा पहिला फॉरमॅट ABCD असलेल्या की-बोर्डमुळे टाइपरायटरवर लिहिणं अवघड होत होतं. त्याचं मुख्य कारण म्हणजे त्याची बटणं एकमेकांच्या खूप जवळ होती. याशिवाय, इंग्रजीमध्ये E, I, S, M सारखी काही अक्षरे जास्त वापरली जातात आणि Z, X अशी काही अक्षरं क्वचितच वापरली जातात. त्यामुळे वारंवार वापरल्या जाणार्‍या अक्षरांसाठी, पूर्ण की-बोर्डवर बोटं फिरवावी लागायची आणि परिणामी टायपिंगचा स्पीड कमी व्हायचा. अनेक अयशस्वी प्रयोगांनंतर, 1870 मध्ये QWERTY फॉरमॅट आला आणि त्यातून की-बोर्डवर बोटं फिरवण्याचं काम कमी झालं. चार अंकीच का असतो ATM PIN? हे आहे त्यामागचं कारण; जाणून घ्या Dvorak फॉरमॅट ठरला फ्लॉप की-बोर्ड बद्दल अनेक प्रयोग सुरू होते. त्यातच Dvorak Model नावाचा एक फॉरमॅट आला होता; मात्र तो Keys मुळे फ्लॉप ठरला. या फॉरमॅटचं नाव इन्व्हेंटर August Dvorak यांच्या नावावरून ठेवण्यात आलं होतं. परंतु तो अल्फाबेटिकल नव्हता आणि तुलनेने जास्त कठीण होता. त्यामुळे फार लोकप्रिय झाला नाही आणि QWERTY मॉडेल प्रसिद्ध झालं. ही आहे इंग्लिश की-बोर्डमागची रंजक कहाणी. अनेक फॉरमॅट बनवून त्यातल्या वेगवेगळ्या त्रुटी लक्षात आल्यानंतर आता असलेला QWERTY की-बोर्ड बनवण्यात संशोधकांना यश आलं होतं.
First published:

Tags: Technology

पुढील बातम्या