• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • फ्रीमध्ये मिळतोय OnePlus Nord LE; संपूर्ण जगात फक्त एकाकडेच असणार हा स्मार्टफोन

फ्रीमध्ये मिळतोय OnePlus Nord LE; संपूर्ण जगात फक्त एकाकडेच असणार हा स्मार्टफोन

हा फोन केवळ एकाच वनप्लस चाहत्याला Give Away केला जाईल. अर्थात हा फोन एकाच ग्राहकाला फ्रीमध्ये दिला जाईल.

 • Share this:
  नवी दिल्ली, 12 एप्रिल : OnePlus चा अफोर्डेबल स्मार्टफोन OnePlus Nord चं नवं वेरिएंट OnePlus Nord LE लाँच झालं आहे. वनप्लसने दिलेल्या माहितीनुसार, LE म्हणजे लिटरली ओन्ली वन एडिशन (literally only one edition) असणार आहे. याचाच अर्थ इतर काही स्पेशल मॉडेल्सप्रमाणे OnePlus Nord LE केवळ काही लोकांसाठीही उपलब्ध होणार नाही. हा फोन केवळ एकाच वनप्लस चाहत्याला Give Away केला जाईल. अर्थात हा फोन एकाच ग्राहकाला फ्रीमध्ये दिला जाईल. OnePlus Nord LE च्या घोषणेदरम्यान फोरम पोस्टवर OnePlus Nord चे Product Manager Andy Liu यांनी सांगितलं की, नवं मॉडेल OnePlus Nord सारखंच आहे, यात 90Hz Fluid AMOLED डिस्प्ले, क्वाड रियर कॅमेरा आणि इतर फीचर्स देण्यात आले आहेत. ओरिजल OnePlus Nord पेक्षा OnePlus Nord LE ला एक वेगळा हटके ग्रेडिएंट देण्यात आला आहे, जो ऑरेंज-ग्रीन असा ट्रॅन्झिशन आहे. याला अतिशय स्मूद फिनिश देण्यात आला आहे. OnePlus Nord LE हा फोन सेलमध्ये एका खास एडिशनमध्ये आणण्याऐवजी वनप्लस कंपनी हा OnePlus Nord LE फोन गिवअवेद्वारे देणार आहे.

  (वाचा - लाखोंमध्ये एखादीच होते अशी गडबड;2 लाख रुपयांत विकला गेला अनोख्या डिझाईनचा iPhone)

  View this post on Instagram

  A post shared by OnePlus Nord (@oneplus.nord)

  Give Away मध्ये भाग घेण्यासाठी तुम्हीही प्रयत्न करू शकता आणि हा फोन फ्रीमध्ये मिळवू शकता. यासाठी तुम्हाला OnePlus Nord चं इन्स्टाग्राम अकाउंट फॉलो करावं लागेल आणि आपल्या इन्स्टाग्रामवर तुमच्या सध्याच्या स्मार्टफोनचा फोटो पोस्ट करावा लागेल. या पोस्टसह #SwitchToNord असं कॅप्शन लिहावं लागेल. अशाप्रकारे तुम्ही OnePlus Nord LE मिळवण्यासाठी पात्र ठरू शकता. गिवअवेमध्ये केवळ एक OnePlus Nord LE यूनिट असणार आहे. हा फोन एकाच लकी ग्राहकाला मोफत मिळणार आहे.
  Published by:Karishma
  First published: