मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /इन्स्टाग्रामवर करता येणार एकाच वेळी 50 जणांना व्हिडीओ कॉल, जाणून घ्या काय करावे लागेल

इन्स्टाग्रामवर करता येणार एकाच वेळी 50 जणांना व्हिडीओ कॉल, जाणून घ्या काय करावे लागेल

लॉकडाऊनच्या काळात सर्वात जास्त लोकं व्हिडीओ कॉलच्या (Video Call) माध्यमातून जोडले गेले आहेत. त्यामुळे अनेक अ‍ॅप्सनी त्यांची व्हिडीओ कॉलची सेवा अपडेट करण्यास सुरूवात केली आहे.

लॉकडाऊनच्या काळात सर्वात जास्त लोकं व्हिडीओ कॉलच्या (Video Call) माध्यमातून जोडले गेले आहेत. त्यामुळे अनेक अ‍ॅप्सनी त्यांची व्हिडीओ कॉलची सेवा अपडेट करण्यास सुरूवात केली आहे.

लॉकडाऊनच्या काळात सर्वात जास्त लोकं व्हिडीओ कॉलच्या (Video Call) माध्यमातून जोडले गेले आहेत. त्यामुळे अनेक अ‍ॅप्सनी त्यांची व्हिडीओ कॉलची सेवा अपडेट करण्यास सुरूवात केली आहे.

मुंबई, 23 मे : संपूर्ण जगभरातील अनेक देशांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून लॉकडाऊन (Coronavirus Lockdown) सुरू आहे. काही ठिकाणी दिवसेंदिवस वाढणारे रूग्ण पाहता लॉकडाऊनचा कालावधी देखील वाढवण्यात येत आहे. दरम्यान या काळात ज्यांचे वर्क फ्रॉम होम सुरू आहे किंवा जे आप्तेष्टांपासून दूर आहेत ते लोकं सर्वात जास्त व्हिडीओ कॉलच्या (Video Call) माध्यमातून जोडले गेले आहेत. त्यामुळे अनेक अ‍ॅप्सनी त्यांची व्हिडीओ कॉलची सेवा अपडेट करण्यास सुरूवात केली आहे. काही दिवसांपूर्वी फेसबुकने मेसेंजर रूम्स (Facebook Messenger Rooms) लाँच केले होते, ज्यामध्ये 50 लोकांना एकाच वेळी व्हिडीओ कॉल करणं शक्य होतं. त्याचप्रमाणे मिळालेल्या माहितीनुसार मेसेंजर रूम्सचे इंटिग्रेशन लवकरच व्हॉट्सअ‍ॅपमध्ये (WhatsApp) देखील येणार आहे.

(हे वाचा-ग्राहकांना SBI चा इशारा! दुर्लक्ष केल्यास एक SMS करेल तुमचं बँक खातं रिकामं)

म्हणजेच व्हॉट्सअ‍ॅपवर देखील 50 जण एकाच वेळी व्हिडीओ कॉलवर बोलणं शक्य आहे. मात्र व्हॉट्सअ‍ॅपआधी हे फीचर इन्स्टाग्रामने (Instagram) सुरू केले आहे. इन्स्टाग्रामने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. यामध्ये सांगितले आहे की अ‍ॅप अपडेट केल्यानंतर इन्स्टाग्रामवरील एक बटन क्लिक करून मेसेंजर रुममधून व्हिडीओ कॉन्फरन्सिंग करता येणार आहे. यात दिलेल्या लिंकच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मित्रांना इनव्हाइट (Invite) देखील पाठवू शकता.

या मेसेंजर रूमचा होस्ट असणाऱ्याला ती रूम लॉक करण्याचा देखील पर्याय असणार आहे. तसच त्यामध्ये कोण असणार हे ठरवण्याचा आणि त्यातून एखाद्याला काढण्याचा अधिकार देखील होस्टकडे असणार आहे.

(हे वाचा-3 कोटी भारतीयांची खासगी माहिती धोक्यात; पत्ता, ईमेल, फोन नंबर झाले लीक)

इन्स्टाग्रामने या फीचरची माहिती देण्यासाठी ट्विटरवर एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. हे फीचर वापरण्यासाठी इन्स्टाग्राममधील डायरेक्ट मेसेजमध्ये जा. त्यानंतर व्हिडीओ चॅटच्या आयकॉनवर क्लिक करा. रूम क्रिएटचा पर्याय दिसल्यावर त्यावर क्लिक करा. रूम जॉईन करण्यासाठी तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना इनव्हाइट पाठवू शकता. हा व्हिडीओ कॉल करण्यासाठी तुमच्या फोनमध्ये फेसबुक मेसेंजर अ‍ॅप असणे आवश्यक आहे.

व्हॉट्सअ‍ॅपसाठी हे अ‍ॅप सध्या बीटा टेस्टिंगमध्ये आहे. अशी अपेक्षा करण्यात येत आहे की लवकरच हे फीचर अँड्रॉइड आणि iOS साठी लाँच केले जाईल.

First published:

Tags: Instagram, Lockdown, Video call, Whats up video call, Work from home