मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

मोठी बातमी! 3 कोटी भारतीयांची खासगी माहिती धोक्यात; पत्ता, ईमेल, फोन नंबर झाले लीक

मोठी बातमी! 3 कोटी भारतीयांची खासगी माहिती धोक्यात; पत्ता, ईमेल, फोन नंबर झाले लीक

नोकरीच्या शोधात असलेल्या 2.91 कोटी भारतीयांची वैयक्तिक माहिती लीक झाली आहे.

नोकरीच्या शोधात असलेल्या 2.91 कोटी भारतीयांची वैयक्तिक माहिती लीक झाली आहे.

नोकरीच्या शोधात असलेल्या 2.91 कोटी भारतीयांची वैयक्तिक माहिती लीक झाली आहे.

  • Published by:  Manoj Khandekar

नवी दिल्ली, 23 मे : ऑनलाईन इंटेलिजेंस कंपनी साइबलने (Cyble) डेटा लीक संदर्भात धक्कादायक बातमी दिली आहे. सायबर गुन्हेगारांनी (Cyber criminals) 2.9 कोटी भारतीयांची खासगी माहिती (Personal data) डार्क वेबवर (Dark web)अपलोड केली आहे. तसंच हा डेटा तिथे विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचंही सांगण्यात आलं आहे. कंपनीने शुक्रवारी एका ब्लॉगमध्ये म्हटलं आहे की, 'नोकरीच्या शोधात असलेल्या 2.91 कोटी भारतीयांची वैयक्तिक माहिती लीक झाली आहे. सहसा असे प्रकार समोर येत नाहीत, परंतु विशेष लक्ष ठेवल्यामुळे बऱ्याच नागरिकांची वैयक्तिक माहिती यामध्ये असल्याचं समोर आलं. यामध्ये शिक्षण, पत्ता, ईमेल, फोन, पात्रता, कामाचा अनुभव इत्यादी गोष्टी आहेत.

फेसबुक आणि अ‍ॅकॅडमीच्या हॅकिंगची माहिती सायबलने नुकतीच उघड केली होती. सायबलने निवेदनात म्हटलं होतं की सायबर गुन्हेगार अशा वैयक्तिक माहिती गोळा करत असतात जेणेकरुन ते त्यांच्या नावाची ओळख चोरी, घोटाळा किंवा हेरगिरी यासारख्या गोष्टी करू शकतात.

धक्कादायक! कोरोना स्क्रिनिंगच्या नावाखाली विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार

22 कोटीहून अधिक विद्यार्थ्यांची माहिती लीक

या महिन्याच्या सुरूवातीला, सर्वात मोठे ई-लर्निंग प्लॅटफॉर्म अनएकाडेमी (Unacademy ) हॅक झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यावेळी यूएस-आधारित सुरक्षा कंपनी सायबलने देखील याची नोंद केली होती, त्यानुसार हॅकर्सने सर्व्हर हॅक करून 22 दशलक्ष विद्यार्थ्यांची माहिती चोरली असल्याचं समोर आलं होतं.

डार्क वेबवर हा तपशील ऑनलाईन विकला जात असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यापैकी विप्रो(Wipro) , इन्फोसिस(Infosys) , कॉग्निझंट(Cognizant), गुगल (Google) आणि फेसबुक (Facebook) मधील कर्मचार्‍यांचा तपशील होता. सिक्युरिटी फर्म सायबलच्या अहवालातून मिळालेल्या माहितीनुसार, अनएकाडेमी चा 21,909,707 डेटा लीक झाला होता, ज्याची किंमत 2,000 अमेरिकन डॉलर्स इतकी आहे.

राज्यातील 'या' भागांमध्ये पुढचे 3 दिवसात उन्हाचा तडाखा, हवामान विभागाचा इशारा

अहवालानुसार, अनएकाडेमीच्या संकेतस्थळावरून आलेल्या डेटामध्ये वापरकर्तानाव, संकेतशब्द, शेवटची लॉगिन तारीख, ईमेल आयडी, पूर्ण नाव, खाते आणि विद्यार्थ्यांचे खाते प्रोफाइल यासारख्या अनेक महत्वाच्या माहितीचा समावेश आहे. तर अनएकाडेमीचे बाजार मूल्य (मार्केट व्हॅल्यू)500 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 3,798 कोटी रुपये) आहे.

First published:

Tags: Cyber crime