नवी दिल्ली, 23 मे : लॉकडाऊनच्या काळात (Lockdown) ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अशावेळी एसबीआयने त्यांच्या ग्राहकांना महत्त्वाचा इशारा दिला आहे. एसबीआयने ट्विट करत अशी माहिती दिली की लोक कशाप्रकारे एका नवीन व्हायरसची शिकार बनत आहेत आणि हे माहित असून सुद्धा ते सजग नाही आहेत आणि मोठी चूक करत आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘पाताल लोक’ (Pataal Lok) या Amazon Prime वरील सीरिजमधील ‘स्वर्ग लोक’, ‘धरती लोक’ आणि ‘पाताल लोक’ या संकल्पनेचा वापर करून अत्यंत कल्पकतेने एसबीआयने त्यांच्या ग्राहकांना अलर्ट केले आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्या युजर्सना ‘स्वर्ग लोक’, ‘धरती लोक’ आणि ‘पाताल लोक’ या तीन प्रकारात वाटले आहे. पाताल लोक म्हणजे ते युजर्स जे माहित नसणाऱ्या लिंकवर क्लिक केल्यामुळे Cerebus Trojan शिकार बनले आहेत. (हे वाचा- व्याजदरात कपात तर आणखी 3 महिने EMI देण्यासाठी सूट, RBI च्या 6 मोठ्या घोषणा ) ‘धरती लोक’ म्हणजे ते युजर्स ज्यांना या Cerebus Trojan मॅलवेअर बद्दल माहित असते तरीही ते या माहित नसणाऱ्या लिंकवर क्लिक करतात. तर ‘स्वर्ग लोक’ म्हणजे ते लोक जे नेहमी फसवणुकीबद्दल जागरूक असतात.
Beware of fake SMSs claiming to provide big offers or information on current pandemic via unknown links or downloading apps from unknown sources, as they are meant to cheat you. Report phishing links to https://t.co/3Dh42ifaDJ pic.twitter.com/mrZob3z6Bd
— State Bank of India (@TheOfficialSBI) May 21, 2020
Cerebus Trojan मॅलवेअर युजरचे बँकिंग डिटेल्स चोरी करण्याचे काम करतात. यामध्ये तुमचे क्रेडिट कार्ड नंबर, सीव्हीव्ही आणि इतर महत्त्वाच्या माहितीचा समावेश असतो. युजरची वैयक्तिक माहिती तर टू फॅक्टर ऑथेंटिकेशन डिटेल्स सुद्धा चोरी केले जाऊ शकतात. कोरोना व्हायरस लॉकडाऊन काळात अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. युजर्सनी चुकीच्या लिंकवर क्लिक केल्यामुळे त्यांना आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागला आहे. एसएमएस द्वारे लिंक पाठवून युजर्सना शिकार बनवण्यात येत आहे. तसंच त्यांना एक धोकादायक अॅप डाऊनलोड करण्यास सांगून त्यांची वैयक्तिक माहिती चोरी केली जात आहे. (हे वाचा- कोरोनाच्या संकटात ही कंपनी देणार बोनस, 15000 फ्रेशर्संना नोकरीची ऑफर) संपादन- जान्हवी भाटकर